Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song  esakal
मनोरंजन

Ganesh Visarjan 2023 : 'पहिलवान आला ते लैला ओ लैला....' अजूनही जुन्या गाण्यांवरच तरुणाई धरतेय ठेका, नवी गाणी ठरताहेत अळणी!

पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील गणेशभक्तांसाठी मोठा आनंदसोहळा असतो.

युगंधर ताजणे

Ganesh visarjan 2023 Pune Ganpati Festival DJ Song : पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील गणेशभक्तांसाठी मोठा आनंदसोहळा असतो. हा विसर्जन सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक, नागरिक गर्दी करत असतात. मानाचे पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक, त्यांची सुंदर सजावट अनेकांचे लक्ष वेधून घेणारी असते. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

ढोल ताशांचा गजर. लेझीम अन् झांज यांचा तो आवाज गणेश भक्तांना नाचण्यास भाग पाडतो. पारंपरिक वाद्यांचा तो ताल ऐकल्यानंतर उपस्थित भक्तांच्या उत्साहाला उधाण येते. तो माहौल काही औरच असल्याचे दिसून येते. अशातच डीजेच्या दणदणाटालाही तितकाच जोरदार प्रतिसाद मिळतो. यात प्रामुख्यानं एक गोष्ट सांगायची झाल्यास, गेल्या अनेक वर्षांपासून डीजेवर वाजणाऱ्या गाण्यांमध्ये ८० ते ९० च्या दशकांतील गाण्यांचाच प्रभाव अधिक असल्याचे जाणवते.

Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

एकीकडे बॉलीवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपटांतील सोशल मीडियावर लाखो व्ह्युज मिळवणारी ती गाणी किती मिरवणूकीत मात्र फारच अळणी ठरतात. म्हणून की काय अजूनही मराठी चित्रपटातील अश्विनी ये ना सारखं प्रेमगीतही तरुणाईची पसंती मिळवताना दिसते. अजय अतुलच्या गाण्यांचा प्रभावही नेहमीप्रमाणे मिरवणूकांमधून जाणवतो. तसेच सैराटमधील झिंगाट गाण्यावर तरुणाई डोलताना दिसते.

९० च्या दशकांतील उडत्या चालीच्या हिंदी गाण्यांची बात काही वेगळीच होती. ते संगीत अजुनही मनाला सुखावणारं ठरतं. म्हणून तर एक बार मुझे भी पिलादे शराबी सारखं गाणं रिमिक्समधून थिरकायला लावतं. याशिवाय मुंगळा मुंगळा मैं गुड की डली, लैला ओ लैला, मैं हु डॉन, राम जी निकली सवारी, अपनी पोडे पोडे, यातही काही साऊथ व्हर्जनमधील गाण्यांवर तरुणाई बेभान होत मनसोक्त नाचते.

इंग्रजीतीलं ब्राझील....ब्राझील...हे गाणं इतके वर्ष झालं तरी अजूनही नव्या पिढीतल्या तरुणाईच्या नाचवतं. बॉलीवूडमधील जंजीर, राम लखन, डॉन, वेलकम, अपना सपना मनी मनी, चित्रपटातील गाणी अजुनही लोकप्रिय आहेत. त्यात राम लखनमधील गाणं हे बँडवाल्यांचे फेव्हरेट गाणं डीजेवर अजुनही तितक्या दमदारपणे वाजतंय. आपका क्या होगा जनाबे अलीची क्रेझ कायम असल्याचे दिसून येते.

मराठी गाण्यांमध्ये देखील पहिलवान आला ओ पहिलवान आला, सैराटमधील झिंगझिंगाट, रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातील सलमानसोबतचं ते गाणं, खंडेरायाच्या लग्नाला, कच कच कांदा....हे मराठमोळं गाणं बऱ्याच ठिकाणी युवा वर्गाचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पंजाबी गाण्यांचा तडकाही लक्ष वेधून घेणारा आहे. मात्र त्यात अजुनही दलेर मेंहदीच्या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. ना ना ना रे सारखं गाणं असो किंवा काला कौआ सारखं गाणं डीजेच्या हिटलिस्टमवर कायम आहे. सत्यामधील सपने मैं मिलती है ओ कुडी मेरी...गाणं तर ऑल टाईम फेव्हरेट असल्याचे दिसून आले आहे. बऱ्याचशा डीजेवर या गाण्याला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT