Garmi Actor Arvanid Shukla Fame Vyom Yadav life  esakal
मनोरंजन

Garmi : 'गर्मी'नं नशीब उजळलं! कोण आहे अरविंद शुक्ला?

गर्मी नावाची मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. व्योमनं त्या मालिकेमध्ये अरविंद शुक्लाची भूमिका साकारली आहे.

युगंधर ताजणे

Who is Vyom Yadav: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या गर्मी नावाच्या वेबसीरिजची सध्या मनोरंजन विश्वामध्ये चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून धुलिया यांच्या या मालिकेनं चाहत्यांचे, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेमध्ये ज्यानं अरविंद शुक्लाची मुख्य भूमिका साकारली आहे त्या अभिनेत्याच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

सोनी लिव्ह वर १ एप्रिलला स्ट्रीम झालेल्या गर्मी नावाच्या मालिकेनं प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळवला आहे. प्रेक्षकांनी दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तिग्मांशू धुलिया यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. तो त्यांचा सिग्नेचर स्टाईल प्रोजेक्ट असल्याचे दिसून आले आहे. अनेक प्रेक्षकांनी या मालिकेचे कौतूक इरफान खान, जिमी शेरगिल यांच्या हासिल चित्रपटाशी केली आहे. गरमी मालिकेतील नवा चेहरा व्योम यादव भलताच फॉर्मात आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गर्मी नावाची मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. व्योमनं त्या मालिकेमध्ये अरविंद शुक्लाची भूमिका साकारली आहे. त्यात तो युपीएससीची परीक्षा करणारा विद्यार्थी आहे. तो त्या विद्यापीठातील राजकारणाचा भाग होऊन जातो. त्याची त्याला चुकवावी लागणारी किंमत, त्यामुळे होणारा गोंधळ आणि त्याची होणारी परिणीती प्रेक्षकांसाठी कौतूकाचा विषय ठरताना दिसत आहे.

अरविंद शुक्लाची भूमिका करणारा व्योम हा २३ वर्षांचा असून तो बनारस येथे राहणारा आहे. व्योमनं दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले असून त्यानं इंजिनिअरींगची पदवीही घेतली आहे. शाळेत असल्यापासून त्याला अभिनयाची आवड असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यावर मेहनत घेत अभिनेता होण्याचं स्वप्न त्यानं पूर्ण करुन दाखवलं. व्योमनं त्याच्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती.

अभिनेता होण्यासाठी व्योमनं मुंबईची वाट धरली. स्टार अनफोल्डनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये एक छोट्याशा खोलीमध्ये व्योमचा संघर्ष सुरु झाला. आठ लोकांसोबत दाटीवाटीनं राहत त्यानं आपल्या नावाची वेगळी ओळख आता निर्माण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT