Gautam Gambhir  esakal
मनोरंजन

Gautam Gambhir : सचिन, धोनीनंतर आता 'गौतम गंभीर' वर ही येणार बायोपिक, दिसणार हा अभिनेता?

युगंधर ताजणे

Gautam Gambhir Bipoic : क्रिकेटचा देव म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी यांच्या आयुष्यावर यापूर्वी बायोपिक प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात आणखी एक गोड बातमी समोर आली आहे.

त्याचे झाले असे की, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील सामन्या दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटपटू गौतम गंभीर, आकाश चोप्रा हे सामन्याचे समालोचन करताना त्यावेळई तिथे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेताही हजर होता. बोलताना त्यांच्यात क्रिकेटर्स आणि त्यांच्यावरील बायोपिक अशी चर्चा सुरु झाली. त्यात गंभीरच्या बायोपिकची चर्चा समोर आली आहे. गौतमनं देखील त्या अभिनेत्याच्या प्रस्तावाला होकार दिल्याचे कळते आहे.

तो प्रसिद्ध अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून विकी कौशल आहे. भारत विरुद्ध आफ्रिकेच्या सामन्या दरम्यान समालोचन करण्यासाठी सहभागी झाला होता. यावेळी त्यानं आपल्याला गंभीरच्या बायोपिकमध्ये काम करण्यास आवडेल असे सांगून मोठा गोड धक्का दिला आहे. यानंतर भारतीय क्रिकेटविश्वात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. द क्रिकेट लाँजने याविषयीचे सविस्तर वृत्त दिले आहे.

Gautam Gambhir Bipoic

विकी कौशल येत्या काळात राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटामध्ये दिसणार आहे. यावेळी त्यानं आपल्या नव्या चित्रपटाचे प्रमोशनही करताना आगामी काळात गंभीरच्या आयुष्यावरील चित्रपटामध्ये काम करण्यास आवडेल असे सांगितले आहे. मात्र याविषयी अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गंभीर, त्याचे व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे.

विकी कौशलला खास निमंत्रित म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी पहिला एक तास त्यानं भारत विरुद्ध आफ्रिकेच्या सामन्याचे समालोचन करुन चाहत्यांना वेगळी ट्रीट दिली होती. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. यानंतर त्यानं गौतम गंभीरच्या आय़ुष्यावरील चित्रपटावरुन केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

यापूर्वी क्रीडाविश्वातील अनेक खेळाडूंवर चित्रपट आले आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, एम एस धोनी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले असून येत्या काळात अनुष्का शर्माचा झुलन गोस्वामीवर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobikwik IPO: मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

SCROLL FOR NEXT