Swades Actor Gayatri Joshi In Ferrari-Lamborghini Crash, 2 Dead : कोणे एके काळी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखसोबत स्वदेसमध्ये चमकलेल्या गायत्रीनं कुटूंबासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती पुन्हा बॉलीवूडमध्ये दिसली नाही. खरंतर तिला स्वदेशकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र तिच्या मनाप्रमाणे काही झालं नाही.
अभिनेत्री गायत्री जोशी चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा आणि तिचा पतीच्या कारचा झालेला अपघात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री अन् तिचा पती हे दोघेही सुखरुप आहेत. गायत्रीनं देखील पोस्ट शेयर करत त्याविषयी माहिती दिली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. गायत्री आणि तिचा पती हे त्यांच्या लॅम्बोरगिनीनं प्रवास करत होते. त्यावेळी एका फेरारीची धडक मोठ्या कंटनेरला बसल्याचे दिसून आले.
Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!
सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स देखील दिल्या आहेत. अनेकांनी गायत्रीप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. गायत्री आणि तिचा पती विकास ऑबेरॉय हे दोघेही त्या कारमधून प्रवास करत होते. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात जन्म झालेल्या गायत्रीनं व्हिडिओ जॉकी म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं ब्युटी स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. त्यात ती यशस्वीही झाली होती.
गायत्री जोशी आहे तरी कोण?
किंग खान शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातून गायत्री पहिल्यांदा बॉलीवूडच्या प्रेक्षकांसमोर आली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्या चित्रपटातही तिचे नाव गायत्री होते. त्यात तिनं एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती. यानंतर गायत्री फारशी कोणत्या चित्रपटामध्ये चमकली नाही. तिनं काही जाहिराती केल्या. यानंतर ती पतीसोबत विदेशात स्थायिक झाली.
टेलिग्राफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, गायत्रीला बॉलीवूडमध्ये मोठी अभिनेत्री होण्याची इच्छा होती. स्वदेसनंतर तिला अनेक चित्रपटांकडून ऑफर्स येतील अशी अपेक्षाही होती. मात्र तसे झाले नाही. त्यापूर्वी तिनं मॉडेलिंगच्या क्षेत्रातही मुशाफिरी केली होती. १९९९ सालच्या मिस इंडिया ब्युटी पिजंट स्पर्धेत ती सर्वोत्तम पाच स्पर्धकांपैकी एक होती. याशिवाय तिनं जागतिक पातळीवर देखील भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ती स्पर्धा जपानमध्ये झाली होती.
२००० साली गायत्रीनं एका म्युझिक व्हिडिओमध्ये सहभाग घेतला होता. त्यात ती प्रसिद्ध गायक जगजीत सिंग आणि हंस राज हंस यांच्या सोबत गायिका म्हणून दिसली होती. त्या व्हिडिओला देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याची बराचकाळ चर्चाही झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.