genelia deshmukh and imran khan coming together after 15 years jaane tu ya jaane na  Esakal
मनोरंजन

Genelia - Imran: जय - आदितीला पाहून चाहते खुश! इमरान - जिनिलीया १५ वर्षांनी पुन्हा एकत्र

जाने तु या जाने ना सिनेमातील जय - आदिती एकत्र का आले? हे आहे खास कारण

Devendra Jadhav

Genelia Deshmukh- Imran Khan: २००८ साली आलेला जाने तु या जाने ना सिनेमा सर्वांना आठवत असेलच. या सिनेमाचं स्वतःचं एक वेगळं फॅन फॉलोईंग आहे. आजही हा सिनेमा पाहणारे असंख्य चाहते आहेत.

अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि इमरान खान हे १५ वर्षांनी एकत्र आलेत. या दोघांना पाहुन चाहत्यांना जाने तु या जाने जा सिनेमाची आठवण आलीय.

(genelia deshmukh and imran khan coming together after 15 years jaane tu ya jaane na)

इमरान खान आणि जिनीलिया डिसूझा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यांच्या भेटीचा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना मात्र आनंद झालाय.

लीना अरान्हा नावाच्या एका इंस्टाग्राम यूजरने हा फोटो शेअर केला आहे. तिने याला कॅप्शन दिले, "या दोघांना भेटून नेहमीच आनंद होतो." या फोटोवर इमरानने कमेंट केलीय.

या दोघांना १५ वर्षांनी एकत्र पाहुन सर्वांना जाने तु या जाने ना सिनेमाची आठवण आली

इमरान खान जाने तू... या जाने ना, दिल्ली बेल्ली, लक, मेरे ब्रदर की दुल्हन, आय हेट लव स्टोरीज आणि एक मैं और एक तू अशा चित्रपटांसाठी ओळखला जातो.

2015 मध्ये तो कंगना रणौतसोबत कट्टी बट्टीमध्ये इमरान शेवटचा दिसला होता. तीन वर्षांनंतर, त्याने 'मिशन मार्स: कीप वॉकिंग इंडी' हा लघुपट दिग्दर्शित केला, जो त्याचा शेवटचा मुख्य प्रवाहातील सिनेमाचा प्रयत्न ठरला. त्यानंतर इमरान इंडस्ट्रीतुन गायब झाला. पण त्याचे चाहते त्याच्या कमबॅकची आतुरतेने वाट पाहत आहेत.

जिनिलीया डिसूझाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर २०२३ च्या सुरुवातीलाच वेड सिनेमाच्या माध्यमातुन जिनिलीयाने संपुर्ण महाराष्ट्राच्या मनामनात राज्य केलं. याशिवाय जिनिलीया लवकरच आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' मध्ये झळकणार आहे.

तिने 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT