genelia deshmukh emotional post on vilasrao deshmukh death anniversary  SAKAL
मनोरंजन

Vilasrao Deshmukh: तुमच्याशिवाय जगणे कठीण आहे... विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त जिनिलीया देशमुखची भावुक पोस्ट

विलासराव देशमुखांच्या पुण्यतिथीनिमित्त जिनिलीयाने भावुक पोस्ट लिहीली आहे

Devendra Jadhav

विलासराव देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. विलासरावांनी महाराष्ट्राचे राजकारणी म्हणुन जनतेच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी.

विलासराव देशमुखांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन बाबांची आठवण जागवत असतो. तर दुसरीकडे विलासरावांची सुन आणि अभिनेत्री जिनीलियाने सोशल मिडीयावर भावुक पोस्ट लिहून त्यांची आठवण जागवलीय.

(genelia deshmukh emotional post on vilasrao deshmukh death anniversary)

जिनिलीयाची विलासरावांबद्दल भावुक पोस्ट

आज विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त जिनिलीयाने तिच्या लग्नातला फोटो शेअर केलाय. यात तिच्या बाजुला विलासराव सासरे म्हणुन खंबीरपणे पाठीशी उभे असलेले दिसत आहेत.

हा फोटो पोस्ट करुन जिनिलीया लिहीते. "प्रिय पप्पा, मला फक्त सांगायचं आहे, तुम्ही विचार करायला खूप छान आहात, पण तुमच्याशिवाय जगणे इतके कठीण आहे. मला खात्री आहे की, तुम्ही कुठेही असलात तरी ते सर्वात खास ठिकाण असले पाहिजे; कारण तुमच्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याची क्षमता आहे. पुन्हा भेटेपर्यंत, आम्हाला तुमची खुप आठवण येते पप्पा."

रितेश - जिनिलीयाच्या वेडचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. वेड सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस साठी सुद्धा छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला.

या तारखेला जिनिलीयाच्या वेडचा वर्ल्ड प्रिमियर

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.’

वेड रविवार २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर आणि २७ ऑगस्टला रात्री ८ वाजता हिंदीमध्ये स्टार गोल्डवर पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT