Girish Oak: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज अभिनेते म्हणजे गिरीश ओक. नाटक असो, मालिका किंवा सिनेमा.. त्यांच्या अभिनयाने कायमच चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्यांचे रंगभूमी वरील योगदानही खूप विशेष आहे.
गेल्यावर्षीच त्यांनी आपल्या कारकिर्दीतल एक महत्वाचा टप्पा पार करत त्यांचे पन्नासावे नाटक '38 कृष्ण व्हिला रंगभूमीवर आणले. या नाटकाचे जोरदार प्रयोग सुरू असतानाच त्यांचे 'काळी राणी' हे अत्यंत वेगळ्या धाटणीचे नाटक रंगभूमीवर आले.
त्यामुळे मनोरंजन विश्वात गिरीश ओक हे नाव सतत चर्चेत असते. त्यांच्यासारखा सहज अभिनय करणं हे आजही कित्येकांना जमत नाही. असे गिरीश ओक सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. आपल्या कामविषयी लिहीत असतात. आज त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय झाली आहे.
(Girish Oak shared post about he wins zee natya gaurav award for his two role in different drama marathi natak )
गिरीश ओक यांनी पोस्ट शेयर करत एक आनंदाची बातमी दिली आहे. शिवाय एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार असं ते म्हणाले आहेत. जाणून घेऊया नेमकं काय म्हणाले आहेत गिरीश ओक..
ते म्हणतात, ''माझा प्रतिस्पर्धी मीच असं इतर कोणाच्या बाबतीत झालंय की नाही मला माहीत नाही पण माझ्या बाबतीत तरी पहिल्यांदा झालं. सध्या माझी दोन नाटकं सुरू आहेत"३८ कृष्ण व्हिला"आणि"काळी राणी"झी नाट्य गौरवला ह्या दोन्ही नाटकांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून मला नामांकन मिळालं.''
''दोन विरुध्द टोकाच्या भूमिका माझ्या माध्यमातून एक मेकींसमोर उभ्या ठाकल्या. आणि काल चक्क दोन्ही भूमिकांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. मला कळंतच नाहिये मी माझ्या कुठल्या भूमिकेचं अभिनंदन करू ते.''
पुढे ते म्हणतात, ''आता तुम्हीही विचाराल तुम्हाला कोणत्या भूमिकेसाठी हवं होतं ?पण असं नाही नं सांगता येत एकीचं नाव घेतलं तर दुसरी माझ्यावर नाराज होणार आणि मलाच दोन्ही भूमिकांचे अजून खूप प्रयोग करायचे आहेत."३८" चे १२५ होत आले आहेतआणि "राणी" चे ५० फक्त..'' अशी पोस्ट शेयर करत गिरीश ओक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.