gossip ani barach kahi new serial on sony marathi stats at 21 august based on what's happen behind the camera  sakal
मनोरंजन

'गॉसीप आणि बरंच काही' सोनी मराठीची दमदार मालिका..

२१ ऑगस्ट पासून सोनी मराठीवर होणार धुमाकूळ..

नीलेश अडसूळ

sony marathi : सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन सातत्याने करत असते. मनोरंजनाची अचूक वेळ हे सोनी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य आहे. मायबाप प्रेक्षक पडद्यावरील मालिकांवर तसंच कलाकारांवर प्रेम करतात. मालिकांच्या पडद्यामागचं वातावरणं कसं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. येत्या २१ ऑगस्टपासून दर रविवारी 'गॉसीप आणि बरंच काही' या मालिकेमधून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती आणि गप्पा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचा विचार करून नवनवे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणत असते. कलाकारांच्या वा मालिकांच्या पडद्यामागच्या गमतीजमती हल्ली सोशल मिडियावर पाहायला मिळतात मात्र जो प्रेक्षकवर्ग या सोशल मिडियापासून, मोबाईलपासून दूर आहे त्या प्रेक्षकवर्गाला आता कलाकारांची, मालिकांची पडद्यापलीकडली धमाल दूरदर्शनच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमामध्ये मालिकांच्या सेटवर जाऊन त्या मालिकेतल्या कलाकारांपैकी एक सूत्रसंचालक घेऊन संपूर्ण पडद्यामागची मजामस्ती त्या सूत्रसंचालकाबरोबरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी सोनी मराठी वाहिनीवरच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातलं पडद्यामागचं ‘गॉसीप आणि बरंच काही’ पाहणं रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT