Grammy Awards 202 esakal
मनोरंजन

Grammy Awards 2024: भारतीय संगीताचा मोठा गौरव, 'ग्रॅमी'वर उमटवली मोहोर! 'This Moment' ने मारली बाजी

प्रख्यात संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या (Shakti Band) अल्बमनं बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Grammy Awards 2024 : जगभरातील संगीतप्रेमींचे ज्या पुरस्काराकडे लक्ष असते त्या नामांकित ग्रॅमी पुरस्काराचा वितरण सोहळा आता पार पडला आहे. यंदाच्या पुरस्कारामध्ये भारतीय संगीतकारांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रख्यात संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या (Shakti Band) अल्बमनं बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

शक्ती बँडमधील कलाकारांना यावेळी ग्रॅमीनं गौरविण्यात आले आहे. शक्ती नावाच्या बँडनं धिस मुव्हमेंट नावाचे गाणे कंपोझ केले होते. या गाण्याला यावेळी ग्रॅमीनं सन्मानित करण्यात आले आहे.त्यात गिटारिस्ट जॉन मॅकलॉग्लिन, उस्ताद जाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain), गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan), तालवादक व्ही सेल्वागणेश आणि व्हायोलिनिस्ट गणेश राजगोपालन यांना ग्रॅमी प्रदान करण्यात आला आहे.

ग्रॅमीवर पुन्हा एकदा भारतीय संगीतकार, वादक आणि गायक यांची मोहोर उमटल्यानं तमाम भारतीय संगीतप्रेमी, श्रोत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्रॅमी जिंकल्यानंतर सोशल मीडियावरुन विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शक्ती बँडला बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटगिरीमधून (Best Global Music Album category ) पुरस्कार मिळाला आहे. त्या बँडनं धिस मुवमेंट (This Moment) नावाचे गाणे कंपोझ केले होते.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या या सोहळ्याला जगभरातील मान्यवर संगीतकार, गायक, वादक उपस्थित होते. यावेळी ज्यांना यंदाच्या ग्रॅमीमध्ये नामांकन होते त्यांचे सादरीकरणही झाले. त्याला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

This Moment अल्बलमध्ये आहे तरी काय?

या अल्बमच्या माध्यमातून प्रेमाची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली आहे. शक्तीचा प्रेरणास्त्रोत संगीत आहे. तो कशाप्रकारे या शक्तीला प्रेरित करतो हे त्या अल्बमच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे. ५० वर्षांपासून संगीताच्या क्षेत्रातील ती वाटचाल आणि तो संघर्ष याचे प्रतिबिंब या अल्बममधून होते. ज्या संघर्षाची सुरुवात साधारण १९७३ मध्ये झाली होती.

विजेत्यांची प्रतिक्रिया...

यंदाच्या सोहळ्यामध्ये अनेकांनी सादरीकरण केले. जे खूपच वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण होते. आम्ही कित्येक वर्षांपासून एकत्रितपणे संगीतविश्वात काम करतो आहोत. आता पुन्हा एका वेगळ्या कलाकृतीतून आपल्या म्युझिकची छाप श्रोत्यांच्या मनात उमटविण्यात यशस्वी झालो ही समाधानाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया शक्ती बँडमधील मॅकलॉग्लिन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT