Grammy Award 2024 Winners  esakal
मनोरंजन

Grammy 2024 Shankar Mahadevan : शंकर महादेवन यांनी 'ग्रॅमी' पुरस्काराचं श्रेय कुणाला दिलं? पुरस्कारानंतर पहिली प्रतिक्रिया

Grammy 2024 पुरस्कारावर शंकर महादेवन, राकेश चौरासिया आणि झाकिर हुसैन यांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

युगंधर ताजणे

Grammy Award 2024 Winners : संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच तोलामोलाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचा वितरण सोहळा आता पार पडला (66th Annual Grammy Awards in Los Angeles) असून भारतीय संगीतकार, वादक आणि गायकांनी त्यावर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. त्यात प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसैन (Zakir Hussain), शंकर महादेवन (Shankar Mahadevan) आणि बासरीवादक राकेश चौरासिया (Rakesh Chaurasia) यांचा ग्रॅमीनं गौरन करण्यात आला आहे.

ग्रॅमी पुरस्कार स्विकारताना शंकर महादेवन यांनी व्यक्त केलेल्या भावना (Shankar Mahadevan Reaction) खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. ते म्हणाले की, मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. हे आमचे टीम वर्क आहे. सगळ्यांच्या सहकार्याशिवाय इतकी मोठी गोष्ट घडत (Grammy Latest Marathi News) नसते. आमचे टीम बॉडिंग देखील कौतुकास्पद होते. मी माझे मित्र, कुटूंब आणि देवाचे खूप खूप आभार मानतो.

मला तमाम भारतीयांचे आभार मानायचे आहेत. त्यांच्या पाठींबा आणि आशीर्वाद हे माझ्या पाठीशी आहेत. मला आपल्या देशाचा गर्व आहे. आपल्या अनेक कलाकारांनी यंदाच्या ग्रॅमीमध्ये बाजी मारल्याचे दिसून आले. त्या सर्वांना देखील मी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करतो. मी माझा हा पुरस्कार माझी पत्नीला अर्पण करतो. माझ्या आतापर्यंतच्या संगीतप्रवासात तिची साथ खूपच मोलाची ठरली आहे.

याशिवाय भारतीय संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केज (Indian music composer and Grammy winner Ricky Kej) यांनी देखील यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय संगीतकार आणि त्यांची कामगिरी याचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, शक्तीनं ग्रॅमी जिंकलं. हे सगळं भन्नाट आहे. भारत आता सगळीकडून झळाळून उठत आहे त्याची चमक वाढत आहे. या सगळ्या विजेत्यांना खूप साऱ्या शुभेच्छा...अशा शब्दांत रिकीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

झाकीरजींनी त्यांच्या भावना व्यक्त करताना चाहते, टीम आणि देशातील चाहत्यांचे आभार मानले आहे. या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. आताच्या क्षणी या सगळ्यांचे सहकार्य महत्वाचे आहे. अशा शब्दांत उस्तादजींनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT