ग्रॅमी पुरस्कार विजेती अमेरिकन गायिका बिली एलिश (Billie Eilish) पॉर्नोग्राफी पाहण्याच्या व्यसनाबद्दल व्यक्त झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने वयाच्या ११व्या वर्षापासून पॉर्न पाहत असल्याचा खुलासा केला. मात्र या व्यसनामुळे तिच्या खासगी आयुष्यावर आणि रिलेशनशिप्सवर खूप वाईट परिणाम झाल्याचं तिने सांगितलं. २० वर्षीय बिली ही २०१५ मध्ये 'ओशन आईज' या गाण्यामुळे प्रकाशझोतात आली. कमी वयात तिने संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा आपल्या नावे केला. 'द हॉवर्ड स्टर्न शो' या रेडिओ शोमध्ये बिली तिच्या व्यसनाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.
"माझ्या मते पॉर्न ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मी आधी खूप पॉर्न पहायचे. वयाच्या ११व्या वर्षांपासून मला पॉर्न पाहण्याची सवय लागली. इतरांप्रमाणेच मीसुद्धा खूप 'कूल' आहे हे दाखवण्याच्या नादात मला पॉर्न पाहण्याचं व्यसन कधी लागलं, हे कळलंच नाही. त्यामुळे माझ्या मानसिक स्वास्थ्यावर खूप वाईट परिणाम झाला. मी पॉर्नच्या इतक्या आहारी गेले होते की त्यामुळे माझ्यात प्रचंड नकारात्मता निर्माण झाली होती. काही पॉर्न तर इतके हिंसक होते की त्यामुळे रात्री मला भयंकर स्वप्नं पडायची", असं बिलीने सांगितलं.
"सुरुवातीला मी अनेकांसोबत सेक्स केलं. ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या करण्यास मी नकार देत नव्हते. कारण त्याच गोष्टींकडे मी आकर्षित व्हायला हवं असं मला वाटत होतं. पॉर्न पाहणं ही खूप साधी बाब आहे असा विचार मी केला होता. पण त्या विचाराचीच मला आता चीड येते", असं ती म्हणाली.
कमी वयातच गायनाला सुरुवात केल्याने बिलीने लॉस एंजिलिसमध्ये घरातच शिक्षण पूर्ण केलं. बिलीच्या अनेक अल्बममध्ये गाण्याचे बोल भडक असल्याने अनेकदा ती चर्चेत आली. 'हॅपियर दॅन एव्हर' या तिच्या दुसऱ्या अल्बममध्ये तिने एकटं राहणं, एकटेपणातून लक्ष विचलित करण्यासाठी पॉर्नोग्राफीमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणं आणि तुटलेलं नातं यांचा उल्लेख केला होता.
बिली एलिश ही चारही टॉप ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी इतिहासातील सर्वांत तरुण व्यक्ती ठरली होती. मात्र या प्रसिद्धीमुळे एखाद्या व्यक्तीला डेट करणं कठीण जात असल्याची खंत तिने व्यक्त केली. "जेव्हा लोक तुम्हाला घाबरतात किंवा तुम्ही त्यांच्यातले नाहीच असा विचार करतात तेव्हा लोकांना भेटणं, डेट करणं खरंच कठीण असतं", असं ती पुढे म्हणाली.
या मुलाखतीत बिलीने कोरोनाची लागण झाल्यानंतरचाही अनुभव सांगितला. ऑगस्टमध्ये तिला कोरोनाची लागण झाली होती आणि जवळपास दोन महिने ती आजारी होती. "मला मरण का येत नाही, असा विचार त्यावेळी येत होता. कारण तो त्रास सहन करणं खूप कठीण होतं. तो सर्वच अनुभव खूप त्रासदायक होता", असं तिने सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.