72 Hoorain Teaser out  Esakal
मनोरंजन

72 Hoorain Teaser: 'द केरळ स्टोरी' नंतर आता येतोय 72 Hoorain, टीझर पाहून उडेल काळजाचा थरकाप

Vaishali Patil

72 Hoorain Teaser: सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु होती ती सुदिप्तो सेन यांच्या द केरळ स्टोरीची. 32हजार तरुणीचे धर्मांतरण करुन त्यांना इस्लाम बनवून आंतकवाद अन् लव्ह जिहाद अशा अनेक विषयांवर या चित्रपटाने प्रकाश टाकला.

अदा शर्मा स्टारर या चित्रपटामुळे बराच वाद विवाद झाला मात्र त्या वादाबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटीपेक्षा जास्त कमाई केली.

या चित्रपटातुन एका विशिष्ट गटाला टार्गेट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता आता या चित्रपटानंतर आणखी एका अशाच धाटणीच्या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. जो रिलिज झाल्यानंतर लगेचच चर्चेत आला आहे.


(Gulab tanwar ashoke pandit movie 72 hoorain teaser out story is similar to the kerala story)

72 Hoorain असं या चित्रपटाचं नाव आहे . या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याबरोबर या चित्रपटाचा एक छोटासा टिझर देखील शेयर केला आहे.

दहशतवाद हा जगभर चिंतेचा विषय आहे, पण हे दहशतवादी कोण आहेत हाही चिंतेचा विषय आहे. ते दुसरे कोणीही नसुन त्यांच्या मेंदूमध्ये प्रचंड विष भरुन त्यांचे ब्रेनवॉश करून जिहादच्या नावाखाली दहशतवादाचा मार्ग पत्करण्यासाठी भाग पाडतात.

असाच एक चित्रपट येत आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान आश्वासन दिले जाते की मृत्यूनंतर 72 कुमारी मुली (अप्सरा) जन्नतमध्ये त्यांच्या सेवेत उपस्थित राहतील.

अशा स्थितीत मृत्यूनंतर हे दहशतवादी 72 हुरांसोबत भ्रष्टतेची स्वप्ने पाहू लागतात आणि त्यांच्या लोभामुळे दहशतवादाच्या क्रूर घटना घडवून आणण्यात कसूर करत नाहीत.

मात्र त्यांना हे कधीच कळत नाही की हा केवळ एक भ्रम आहे. सत्यात तस काहीच नसतं. त्याचा केवळ वापर करुन घेतला जातो.

ओसामा बिल नादेन, अजमल कसाब, याकूब मेनन, मसूद अझहर, हाफिज सईद, सादिक सईद, बिलाल अहमद आणि हकीम अली यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांची नावं या टिझरमध्ये समाविष्ट केली आहेत.

त्यांचे पोस्टरही टीझरमध्ये दिसत आहे. जगभरात दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांना टार्गेट करून हा चित्रपट कसा बनवण्यात आला आहे, याचा अंदाज या टीझरवरून लावता येतो.

या चित्रपटाची निर्मिती दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पुरण सिंग करत आहेत. पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर स्टारर '72 हुरें' गुलाब सिंग तन्वर निर्मित आणि अशोक पंडित यांनी सह-दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT