gulabjaam 2 movie released soon sonali kulkarni vaibhav tatwawadi directed by sachin kundalkar SAKAL
मनोरंजन

Gulabjam 2: पुन्हा पसरणार खमंग गोडवा, गुलाबजाम 2 लवकरच, सोनाली कुलकर्णी सोबत वैभव तत्ववादीची जोडी रंगणार

Devendra Jadhav

Marathi Movie : गुलाबजाम सिनेमा सर्वांना आठवत असेलच. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भुमिका असलेला गुलाबजाम सिनेमा त्याच्या वेगळ्या विषयामुळे सर्वांना आवडला होता. गुलाबजाम सिनेमााच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी. गुलाबजाम सिनेमाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण या सिक्वेलमधुन सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट झालाय.

2018 मध्ये रिलीज झालेला गुलाबजाम या चित्रपटाने संपूर्ण भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितपणे सुपरहिट कामगिरी केली. आता मोठी बातमी म्हणजे सचिन कुंडलकरच्या बहुप्रतिक्षित गुलाबजाम 2 ची घोषणा झालीय. या सिक्वेलमध्ये वैभव तत्ववादी आणि सोनाली कुलकर्णीची जोडी झळकणार आहे.

(gulabjaam 2 movie released soon sonali kulkarni vaibhav tatwawadi directed by sachin kundalkar)

गुलाबजाम 2 बद्दल वैभव म्हणाला, “देव खरोखरच दयाळू आहे आणि अशा नेत्रदीपक प्रकल्पांचा भाग असल्याची घोषणा करताना खूप आनंद वाटतो! सचिन कुंडलकर सोबत काम करणे हा नेहमीच एक चांगला अनुभव राहीलाय माझ्यासाठी.

सोनालीसोबतचा हा माझा पहिला चित्रपट असेल आणि गुलाबजाम 2 सोबत आम्ही कशाप्रकारे जादू निर्माण करतो याची मी खरोखरच वाट पाहत आहे.”

सचिनसोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना वैभव पुढे म्हणाला, “सचिनची अपवादात्मक दिग्दर्शनाची दृष्टी, फ्रेमिंगची जन्मजात समज आणि उल्लेखनीय लेखन कौशल्याने त्याला चित्रपटसृष्टीत त्याच्या काळाच्या पुढे स्थान दिले आहे.

त्याच्याबरोबर दुसऱ्यांदा काम करत असल्याने, मी निश्चितपणे म्हणू शकतो की लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचे अतुलनीय कौशल्य आणि आमचा मजबूत संबंध निःसंशयपणे आमच्या प्रकल्पांमध्ये योगदान देतात.

आमच्या पहिल्या एकत्रित कामात, मला त्याची स्पष्टता आणि सेटवर तयार केलेली वागणूक आठवते. सचिनची एका प्रसंगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन मला आवडत आलाय. आणि एक अभिनेता म्हणून सचिन माझ्यावर कायमची छाप पाडत आलाय.”

वैभव गुलाबजाम 2 साठी कसुन मेहनत घेतोय. याशिवाय गुलाबजाम 2 च्या सिक्वेलमधुन सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट झालाय का? अशीही चर्चा सुरु आहे. दरम्यान गुलाबजाम 2 ची घोषणा झाल्यापासुन चाहत्यांना मात्र आनंद झालाय.

वैभव काही महिन्यांपुर्वी निर्मल पाठक की घर वापसी या कौटुंबिक वेबसिरीजमधील दिसला होता. वैभव तत्ववादीने अलीकडेच बहुप्रतिक्षित अॅक्शन थ्रिलर कमांडोचा भाग असल्याची घोषणा केली. आता गुलाबजाम 2 मध्ये वैभव सोनालीसोबत काय जादू दाखवणार हे पहायचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT