Dara Singh As Hanuman: आज हनुमान जयंती. ज्याच्या सामर्थ्याचे गोडवे गायले जातात अशा पवनपुत्र हनुमानाची आज जयंती.
हनुमानाचं नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येतात ते हनुमानाची भुमिका साकारणारे दारा सिंग डोळ्यासमोर येतात.
(Hanuman Jayanti 2023 Dara Singh gave up non-vegetarian food for the role of Hanuman)
'द ग्रेट खली' आणि 'जिंदर महल' हे आज कुस्तीत मोठे नाव बनले होते, त्याआधी देशाचे प्रतिनिधित्व एकमेव नाव होते ते म्हणजे 'दारा सिंग'. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि मोठे झालेले दारा सिंग रंधवा हे कुस्तीपटू होते.
कुस्तीच्या मॅटवर लढण्यापासून ते कुस्तीच्या रिंगमध्ये स्थान मिळवण्यापर्यंत दाराने स्वत:चे नशीब लिहिले. रुस्तुम-ए-हिंद या नावाने प्रसिद्धी मिळालेल्या दारा सिंह यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 500 सामने खेळले आहेत.
200 किलो किंग काँगला पराभूत करणाऱ्या दारा सिंगने 10 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. त्याने राष्ट्रकुल, जागतिक कुस्ती, मलेशियाचा चॅम्पियन अशा सामन्यांचे विजेतेपद पटकावले.
दारा सिंग यांना खरी ओळख मिळाली ती रामायण मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेमुळे. दारा सिंग यांनी त्यांच्या अभिनयाने हनुमानाची भूमिका अजरामर केली.
कोइमोईला दिलेल्या मुलाखतीदरम्यान दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंहने खुलासा केला होता कि, रामायणातील हनुमानाची भूमिका करताना त्याच्या वडिलांनी मांसाहार खाणे बंद केले होते.
बिंदूने सांगितले होते की, “जेव्हा माझे वडील हनुमानाच्या पात्राचे शूटिंग करत होते, तेव्हा त्यांनी मांसाहार करणे बंद केले होते.
नाश्ता करून तासभर ते हनुमानाच्या भूमिकेचा अभ्यास करायचे. शूटिंग करताना ते दिवसभर काही खात नसत. जेवताना ते नारळपाणी किंवा काही ज्यूस प्यायचे.
दारा सिंग हनुमानाच्या भूमिकेत एवढे घुसले होते कि रामायणाच्या शूटिंगनंतरही ते दिवसभर मेकअप काढत नसत. इतकंच नव्हे.. दारा सिंग झोपेतही हनुमानाचे संवाद बडबडत होते.
तेव्हा त्यांची पत्नी सुरजित त्यांना जाणीव करून द्यायची कि ते शूटिंगवर नाहीत तर ते घरी आहेत. एखाद्या भूमिकेसाठी एवढी मेहनत घेणं हे क्वचितच घडतं.
आपण जी भूमिका करतोय त्याचं पावित्र्य आणि महत्व लक्षात घेत त्यानुसार स्वतःच्या जीवनात बदल करणं हे फार कमी कलाकारानं जमतं. दारा सिंग हे अशाच दुर्मिळ कलाकारांपैकी एक आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.