बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असते. तनुश्रीचे नाव कधी मी-टू मोहिमेसाठी तर कधी न्यायालयीन खटल्यामुळे चर्चेत येत आहे. तनुश्री दत्ता आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. तनुश्री दत्ताने अनेक चमकदार चित्रपटांमध्ये केवळ तिच्या अभिनय कौशल्याचा प्रसार केला नाही तर 2004 साली मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
तनुश्री दत्ता एके काळी लाखो हृदयांची धडकन बनली होती. एका गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 'आशिक बनाया आपने' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या तनुश्रीने तिच्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिले.
तनुश्रीचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे एका बंगाली कुटुंबात झाला. जमशेदपूरमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर ती पुण्याला गेली. तिने पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. यानंतर तनुश्रीने मनोरंजन विश्वाकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासोबतच तिने मॉडेलिंगला सुरुवात केली.
वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी तनुश्री दत्ता मिस इंडिया बनली होती. इतकेच नाही तर, तनुश्री ने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तनुश्रीला या स्पर्धेत फक्त टॉप १०मध्येच स्थान मिळवता आले.
तनुश्री दत्ताने 'आशिक बनाया आपने' चित्रपटानंतर 'चॉकलेट'मध्ये काम केले. हे दोन्ही चित्रपट 2005 मध्ये आले होते. यानंतर तिने 'भागम भाग', 'ढोल' आणि 'गुड बॉय बॅड बॉय' सारखे चित्रपट केले. 2010 मधला 'अपार्टमेंट' हा तिचा शेवटचा चित्रपट होता.
अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही तनुश्रीला चित्रपटसृष्टीत जे स्थान मिळायला हवे होते ते मिळाले नाही. यानंतर चित्रपटसृष्टीला अलविदा म्हणत ती अमेरिकेला शिफ्ट झाली. आता तनुश्री दत्ता चित्रपटात पुनरागमन करणार असल्याची चर्चा आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.