har har mahadev movie trailer out cast release date subodh bhave sharad kelkar nsa95 sakal
मनोरंजन

Har Har Mahadev: जिथं तिथं 'हर हर महादेव'चीच चर्चा, ट्रेलर पाहून अंगावर काटाच..

'हर हर महादेव'च्या ट्रेलरला काही तासातच लाखो लोकांनी दिली पसंती..

नीलेश अडसूळ

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. सोमवारी रात्री या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर लगेच हा ट्रेलर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला आणि अवघ्या काही तासांतच प्रथम क्रमांकावर ट्रेंड होत, तो वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला. हा ट्रेलर पाहून अंगावर काटा नाही आला तर नवलच..

केवळ मराठीच नाही तर इतर भाषांतील ‘हर हर महादेव’च्या ट्रेलरलाही असाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी आणि हिंदी ट्रेलरला युट्युबवर अवघ्या काही तासांतच वीस लाखांच्यावर व्ह्युज मिळाले असून ट्विटरवरही हजारो ट्विट्समुळे तो प्रथम क्रमाकांवर ट्रेंड करण्यात यशस्वी झाला. तामिळ चित्रपटसृष्टीत मक्कल सेल्वन म्हणजे सामान्य लोकांचा नायक अशी ओळख असलेल्या सुपरस्टार विजय सेथुपती यांनीही या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर आपल्या ट्विटर हॅंडलवरून शेअर केला, जो अनेक जणांनी रिट्विटही केला आहे.

सुबोध भावे (subodh bhave) यांनी अतिशय समंजसपणे साकारलेली शिवाजी महाराजांची करारी बाण्याची भूमिका आणि दमदार व्यक्तिमत्व असलेल्या शरद केळकर (sharad kelkar) यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेचं दर्शन या ट्रेलरमधून होत असून या दोन्ही अभिनेत्यांना प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे. अंगावर शहारा आणणारे लढाईचे दृश्य आणि त्याच्या जोडीला त्याच ताकदीच्या संवादांनी विस्मयकारक अनुभव दिल्याच्या प्रतिक्रिया अनेकजण समाजमाध्यमांवर देत आहेत.

अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होत आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हर हर महादेव या चित्रपटात पडद्यावर ज्याप्रमाणे कसलेल्या कलाकारांची टीम आहे त्याचप्रमाणे पडद्यामागेही तेवढ्याच कसलेल्या तंत्रज्ञांच्या टीमने यावर काम केलंय. यातील सर्व कलाकारांच्या लूक डिझाईनचे काम केले आहे प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी तर वेशभूषेची बाजू सांभाळली आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते नचिकेत बर्वे यांनी. अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांसाठी छायालेखन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डीओपी त्रिभुवन बाबू सदिनेनी यांनी ‘हर हर महादेव’चे छायादिग्दर्शन केले आहे. हितेश मोडक यांचे जबरदस्त संगीत असलेल्या या चित्रपटाची गीते मंदार चोळकर आणि मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT