hardeek joshi praise cm eknath shinde for his work in irshalwadi khalapur landslide SAKAL
मनोरंजन

Khalapur Landslide: तुमच्या कार्याला सलाम! इर्शाळवाडीतील मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिक जोशीने केलं कौतुक

खालापूर इर्शाळवाडीत जी दुर्घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिकने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय

Devendra Jadhav

Khalapur Landslide Hardik Joshi News: तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशी सोशल मिडीयावर चर्चेत असतो. हार्दिक जोशीने काही दिवसांपुर्वी अभिनेत्री अक्षया देवधर सोबत लग्न केलं.

हार्दिकने अगदी काहीच दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. खालापूर इर्शाळवाडीत जी दुर्घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्र्यांची तत्परता बघुन हार्दिकने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय.

(hardeek joshi praise cm eknath shinde for his work in irshalwadi khalapur landslide)

हार्दिकने केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

रायगड जिल्ह्यात इर्शालवाडी येथे दरड कोसळली. ती बातमी मुख्यमंत्रीसाहेबांना कळताच, ते घटनास्थळी पोचले व स्वतः सर्व परिस्थिती व व्यवस्थापन बघितले. इतक्या तातडीने काम करणारे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नक्कीच नोंद होईल.

खरा नेता, जो तळमळीने संकटकाळी धावून जातो, आपुलकीने विचारपूस करतो. धीर देतो. आपले उत्तरदायित्व समजून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता रस्त्यावर उतरलेल्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सलाम..

खालापूर दुर्घटना

इर्शाळवाडी गावात बुधवारी रात्री भूस्खलन झाल्याचा प्रकार समोर आला. या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप १०० ते १५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

लालबागचा राजा धावून आला

या संकटाच्या काळात इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा धावून आले आहे.

महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंची मदत मंडळाकडून करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT