Haryana nuh gurgaon Violence dharmendra and sonu sood  esakal
मनोरंजन

Haryana Violence Celebs Reaction: 'माणूसकी जळतेय अन् आपण अजूनही...' धर्मेंद्र यांच्या डोळ्यात पाणी!

हरियाणाच्या विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडलच्या यात्रेच्या दरम्यान झालेल्या हिंसेचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Haryana nuh gurgaon Violence dharmendra and sonu sood : देशातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण हे सध्या वेगळ्या प्रकारे बदलताना दिसते आहे. मणिपूरमधील घटनेनंतर आता हरियाणामध्ये देखील हिंसाचाराला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. त्या राज्यामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे.

हरियाणाच्या विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडलच्या यात्रेच्या दरम्यान झालेल्या हिंसेचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहे. त्यावरुन वातावरण अतिशय गंभीर झाले आहे. त्याची दखल पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली असून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. यात आता बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी या मुद्दयांवरुन तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि सोनू सूद यांच्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यत जो हिंसाचार उसळला आहे त्यात पाच लोकांची हत्याही झाली आहे. त्यानंतर नुह जिल्ह्यातील मेवात सोबतच आणखी काही परिसरामध्ये तणावाची परिस्थिती आहे. तसेच गुरुग्राम सोबतच काही गावांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. नुहमध्ये जो हिंसाचार झाला त्यात २३ लोकं जखमी झाले आहेत. त्यामध्ये १० पोलिसांचा समावेश आहे.

५० वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. त्यावर बॉलीवूड सेलिब्रेटींच्या आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. यावेळी धर्मेंद्र आणि सोनू सूद यांनी लोकांना हात जोडून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. धर्मेंद्र यांनी तर दोन्ही हात जोडून म्हटले आहे की, ये कहर... क्यों... किस लिए? बक्श दे मालिक... अब तो बक्श दे...अब बर्दाश्त नहीं होता... असे म्हणत त्यांनी हात जोडल्याचा इमोजी शेयर केला आहे. त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

सोनू सूदची पोस्ट देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तो म्हणतो की, 'ना किसी का घर जला, ना किसी की दुकान, बस जल रही थी इंसानियत, देख रहा इंसान' अशा प्रकारे दोन्ही सेलिब्रेटींनी सध्या हरियाणामध्ये जे काही होते आहे त्यावरुन त्यांनी लोकांना शांतता राखण्यास सांगितले आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याकडून शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. असे आवाहनही या दोन्ही सेलिब्रेटींनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT