पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या PM Narendra Modi सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं या काळात मनोरंजन क्षेत्रातही वेगवेगळे बदल दिसून आले. या दरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी उपस्थित केला होता. या काळात चित्रपटांच्या सेन्सॉरशिपवरुनही बरीच चर्चा झाली होती. अनेकांनी त्या सेन्सॉर बोर्डाला आणि पध्दतीला आपला विरोध दर्शवला होता. त्याची सोशल मीडियावर चर्चाही झाली होती. मोदी सरकारनं समाजपयोगी धोरणं जाहीर केली होती त्यावर बॉलीवूडमध्ये चित्रपट आले होते. ते चित्रपट आणि त्यातून कशाप्रकारे सरकारच्या धोरणांचा प्रचार करण्यात आला होता याची माहिती आपण घेणार आहोत. (have you seen these movies based on modis branding 7 yrs of modi govt)
सरकारच्या धोरणांचा प्रचार करणा-या चित्रपटांमध्ये पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, उरी द सर्जिकल स्ट्राईक, मिशन मंगलयान, पोखरण, पीएम नरेंद्र मोदी या नावांचा समावेश करावा लागेल. या चित्रपटांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या धोरणांना मोठ्या प्रमाणात 'ग्लोरिफाईड' करण्यात आले होते. काहींनी या चित्रपटांचे कौतूक केले. तर अनेकांनी सरकारच्या कार्याचा प्रचार करणारे चित्रपट असे म्हणून त्यांच्यावर टीका केली होती.
1. टॉयलेट एक प्रेमकथा - मोदींच्या स्वच्छ भारत अभियान या उपक्रमावर हा चित्रपट आधारलेला होता. त्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. विनोदी पध्दतीनं आरोग्याच्या गंभीर प्रश्नाला प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम या चित्रपटानं केलं होतं. या चित्रपटात बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्या जोडीला भूमी पेडणेकर ही अभिनेत्री होती. अक्षयनं हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखतही घेतली होती. नारायण सिंह यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ११ ऑगस्ट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. भारत विकसित देश होण्याच्या दिशेकडे वाटचाल करत असताना अद्याप ग्रामीण भागात शौचालयाचा प्रश्न किती गंभीर आणि जटील आहे. यावर टॉयलेट एक प्रेमकथेच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले होते.
2. पॅडमॅन - बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रमोशनसाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे अक्षयनं पंतप्रधान मोदी यांना पॅडमॅनच्या स्क्रिनिंगसाठी येण्याचे निमंत्रणही दिले होते. त्यानं भाजपच्या अनेक मंत्र्यांनाही यावेळी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी बोलावले होते. आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात राधिका आपटे, सोनम कपूर यांनी काम केले होते. तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ता अरुणाचलम मुरुगंथम यांच्या कामावर आधारित हा चित्रपट होता. ज्याचा संबंध मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाशी जोडण्यात आला होता. महिलांच्या मासिक पाळीसारख्या गंभीर विषयाची मांडणी प्रभावीपणे या चित्रपटामध्ये करण्यात आली होती. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला होता.
3. उरी: द सर्जिकल स्ट्राईक - उरीतील घटनेचा मोठा प्रभाव बॉलीवूडवरही दिसून आला. त्या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. देशात युध्दजन्य वातावरण निर्मितीही या घटनेच्यावेळी झाली होती. त्यावर ११ जानेवारी २०१९ मध्ये उरी द सर्जिकल स्ट्राईक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोदींच्या राजवटीत घडलेली ही घटना, त्या घटनेला भारतीय सैनिकांनी दिलेले जशास तसे उत्तर आणि पुढे चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर उरीनं केलेलं गारुड खूप काही सांगून जाणारं होतं. सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय जवानांनी पीओके मध्ये जाऊन आतंकवाद्यांना ठार केले होते. ज्याची चर्चा अनेक महिने माध्यमांमध्ये झळकत होती.
दिग्दर्शक आदित्य धर यांनी मोठ्या कल्पकतेनं उरी चा विषय प्रेक्षकांसमोर आणला होता. मात्र केवळ याच घटनेवर चित्रपटाची निर्मिती करता येणार नाही. असे आदित्य यांना वाटले होते. त्यामुळे त्यात त्यांनी अनेक गोष्टींची भर घातली होती. चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन गृहमंत्री, संरक्षण मंत्री, रॉ चे प्रमुख या सगळ्या व्यक्तींचा संदर्भ आला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशल, मोहित रैना यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
4. मिशन मंगल - मंगळ ग्रहावर भारतीय उपग्रह जाणं ही मोठी बाब होती. त्याचं कौतूक जगभरानं केलं होतं. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मिशन मंगलयान मध्ये जे योगदान होते त्यांच्यावर हा चित्रपट आधारित होता. अर्थात ही घटनाही मोदींजींच्या काळात घडली होती. त्यामुळे इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटातही त्यांचा उल्लेख या चित्रपटात आला आहे. त्यात ते शेवटच्या प्रसंगात दाखवण्यात आले आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे मोदी कौतूक करत आहेत. हे दृश्य प्रेक्षकांनी पडद्यावर पाहिले होते. त्याने ते भारावून गेले. या चित्रपटातही अक्षय कुमारनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्या जोडीला विद्या बालन ही अभिनेत्री होती. अवकाश विज्ञानासारखा क्लिष्ट विषयही मोठ्या खुमासदार पध्दतीनं मांडण्यात दिग्दर्शक जगन शक्ती यांना यश आले होते.
मिशन मंगल हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतूक केले होते. यात तापसी पन्नु, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी, शर्मन जोशी, विक्रम गोखले यांच्या भूमिका होत्या.
5. सुई धागा - अनेकांना या चित्रपटाचा मोदी सरकारशी काय संबंध असे वाटण्याची शक्यता आहे. मात्र त्यावेळी मोदी यांनी मेकिंग इंडियाची जोरदार घोषणाबाजी केली होती. त्या दरम्यान आलेला हा चित्रपट होता. एका सर्वसामान्य कुटूंबातील नवरा बायकोची संघर्षगाथा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. त्यात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. प्रेक्षकांचा या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. शिलाई काम करणारा एक तरुण आपल्या कष्टाच्या जोरावर मोठा व्यावसायिक कसा होतो याची गोष्ट चित्रपटातून मांडण्यात आली होती. कालांतरानं या चित्रपटाचे मीम्सही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मोदींजींवर टीका करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आल्याचे दिसून आले.
शरद कटारिया यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आदित्य चोप्रा आणि मनिष शर्मा यांनी प्रोड्युस केला होता. २८ सप्टेंबर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
6. पीएम नरेंद्र मोदी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक २४ मे २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट दोन वेळा प्रदर्शित करण्यात आला होता. ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता विवेक ऑबेरॉय याने केली होती. चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. २०१४ च्या निवडणूकीत मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले. तेव्हापासूनच्या अनेक राजकीय घटना या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. २०१३ साली नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून ते मोदींचा पंतप्रधान होण्याचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. चहावाल्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान कसा झाला, असा प्रचार या चित्रपटाच्या वेळी करण्यात आला होता.
पुढे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी देशाचे पंतप्रधान पद कसे भूषवले याचे चित्रण पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात पाहायला मिळते. प्रत्यक्षात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला म्हणावा असा प्रतिसाद काही मिळाला नाही. अनेकांनी त्यावर सडकून टीका केली. मोदींची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून केल्याचा आरोपही काहींनी केला होता. आयएमडीबीनं या चित्रपटाचं रेटिं करताना तीन स्टार दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.