Hema Malini, Mithun Chakraborty performance in 'Hunarbaaz- Desh ki Shan' Google
मनोरंजन

ड्रीमगर्ल हेमामालिनी सोबत मिथुन यांचा रोमॅंटिक डान्स तुफान व्हायरल

'हुनरबाज'च्या मंचावर 80 च्या दशकातील या दोन कलाकारांनी सिनेसंगीताचा सुवर्ण काळ जागवला.

प्रणाली मोरे

'हुनरबाज'(Hunarbaaz) या लोकप्रिय रिअॅलिटी शो मध्ये लवकरच आपण पाहू शकणार आहात हेमामालिनी(Hema Malini) आणि मिथुन चक्रवर्ती(Mithun Chakraborty) यांचा रोमॅंटिक डान्स. या कार्यक्रमाच्या आगामी भागात हेमामालिनी परिक्षक बनून येणार आहेत. शो मधील या भागाचा प्रोमो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा शो स्पर्धकांमधील विशिष्ट कलांना दाखवायची संधी आपल्या माध्यमातून देतो. यामध्ये स्पर्धकांची प्रतिभा संपूर्ण देशापर्यंत पोहोचत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतच परिणिती(Pariniti Chopra) चोप्रा आणि करण जोहर(Karan Johar) दे दोघे देखील या शो चे परिक्षण करत आहेत.

या शो च्या आगामी भागात हेमामालिनी परिक्षक बनून आल्या आहेत. या विशेष भागाचा प्रोमो सध्या सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. कारण या प्रोमोत मिथुन आणि हेमामालिनी स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहेत हे खास कारण हे त्यामागे बरं का. या दोघांनीही ८० च्या दशकातील अनेक सिनेमांतून काम केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघं एकत्र आले आणि प्रेक्षकांसमोर त्यांनी आपल्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून जुन्या सिनेमांचा गोल्डन काळ पुन्हा जागवला. या कार्यक्रमात हेमामालिनी यांच्या आधी माधुरी दिक्षित,फराह खान देखील येऊन गेल्या आहेत. सगळ्याच पाहुणे म्हणून आलेल्या परिक्षकांनी स्पर्धकांसोबत धम्माल मस्ती केलेली आपण पाहिली असेलच.

हेमामालिनी यांनी अभिनेत्री म्हणून सिनेकारकिर्द गाजवली आहेच पण त्याचसोबत त्या मथुरा येथून भाजपाच्या सांसद म्हणूनही काम पाहत आहेत. राजकारणात प्रवेश करुनही त्या आजही आपल्यातील कला जोपासून आहेत हे विशेष. त्या आजही टी.व्ही कार्यक्रमातनं किंवा काही सिनेमांतून काम करताना आपल्याला दिसतात. मिथुन आणि हेमामालिनी यांनी 'हुनरबाज' च्या रंगमंचावर केलेला परफॉर्मन्स सध्या प्रोमोच्या माध्यमातून सारेच प्रेक्षक एन्जॉय करतच आहेत तसंच हा भाग छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT