Hema Mailni On Gadar 2: सध्या मनोरंजन विश्वात सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची हवा पहायला मिळत आहे. या चित्रपटाने गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सनी देओल आणि अमिषाच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
सनी देओलच्या चाहत्यांबरोबरच त्याच्या घरच्यांचाही या चित्रपटाला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सनी देओलचे वडिल धर्मेंद्र आणि त्याची सावत्र बहीण ईशा देओल यांनी चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर ते स्वत:ला गदर 2 चित्रपटाचे कौतुक करण्यापासून रोखू शकलेले नाहीत.
आता मात्र सनी देओल यांची सावत्र आई हेमा मालिनी यांनीही देखील गदर 2 चित्रपट पाहिला आहे. हा चित्रपट पाहून बाहेर पडत असतांना त्यांना मीडियाने घेरले. यावेळी त्यांनीही या सिनेमाबद्दल प्रतिक्रिया देत सनीच्या अभिनयाचे कौतुक केले.
गदर 2 पाहिल्यानंतर त्या खूपच आनंदी दिसत होत्या. चित्रपटाबाबत बोलतांना हेमा मालिनी म्हणाल्या की, खूप छान वाटलं. सिनेमा खूपच मनोरंजक करणारा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा 70 आणि 80 च्या दशकात गेल्यासारखं वाटलं. अनिल शर्मा जी यांनी खुपच उत्तम दिग्दर्शन केलयं. सनीनेही खुपच शानदार असा अभिनय केला आहे. असं म्हणत त्याचबरोबर त्यांनी उत्कर्ष शर्मा आणि सिमरतच्या अभिनयाचंही कौतूक केले.
पुढे त्या म्हणाल्या, "हा सिनेमा पाहिल्यानंतर देशप्रेमाच्या भावनेने मन भरुन येते. हिंदू आणि मुस्लिमांप्रती बंधुभाव असायला हवा हा विषय चित्रपटात शेवटपर्यंत दाखवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानसाठी खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे."
सनी देओल आणि अमिषाच्या जोडीबद्दल बोलतांना हेमा मालिनी म्हणाल्या की, "22 वर्षांनंतरही सनी आणि अमिषा एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. दोघांनी खूप चांगलं काम केलं आहे. चित्रपटाची गाणी त्याकाळी खूप हिट झाली होते आणि त्याचा रिमेक केल्यानंतरही गाणी खुप चांगली आहेत. त्यामुळे चित्रपट खूप छान वाटला."
गदर 2 चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सनी देओलच्या 'गदर 2' ने एका आठवड्यात 300 कोटींचा गल्ला जमवून इतिहास रचला आहे. 2001 मध्ये आलेल्या गदरचा हा सिक्वेल आहे. आता गदर 3च्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.