Hemangi Kavi Marathi Movie Actress Trolled  esakal
मनोरंजन

Hemangi Kavi: 'परदेशात काढलेले फोटो जास्तच क्लिअर येतात!' हेमांगी ट्रोल

सध्या हेमांगीच्या एका नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमीप्रमाणे त्या पोस्टवरुन ती ट्रोलही झाली आहे.

युगंधर ताजणे

Hemangi Kavi News: मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या रोखठोक स्वभावाबद्दल आणि प्रतिक्रियेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री हेमांगी कवीचा उल्लेख करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल )(Social media viral news) मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिच्या पोस्टमुळे ती चाहत्यांच्या टॉप सर्चिंग लिस्टमध्ये असते. हेमांगीचा रोखठोपणा हा (entertainment news) तिच्या चाहत्यांना भावतो. आपल्याला जे पटतं ते परखड आणि ठामपणे मांडणे यामुळे हेमांगी सोशल मीडियावर चर्चेतील सेलिब्रेटी झाली आहे. कोणत्याही एखाद्या गोष्टीवर हेमांगीला काय वाटते हे तिच्या चाहत्यांच्या दृष्टीनं महत्वाचे झाले आहे.

सध्या हेमांगीच्या एका नव्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमीप्रमाणे त्या पोस्टवरुन ती ट्रोलही झाली आहे. असं काय झालं की नेटकऱ्यांनी पुन्हा हेमांगीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हेमांगीची ती पोस्ट सोशल मीडियावर अनेकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडताना दिसत आहे. त्यात हेमांगी म्हणते, बाहेरच्या देशांमध्ये काढलेले photos जास्त clear and clean येतात. आपल्या आणि आपल्या mobile camera मध्ये Pollution चा थर नसावा म्हणून असेल का? असं म्हणताना हेमांगीनं एक तळटीप देखील लिहिली आहे. त्यात ती म्हणते, सहज एक observation आहे, कुठला महान शोध लावल्याचा दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या pollution ला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे.

हेमांगीच्या या पोस्टला नेहमीप्रमाणे तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दुसरीकडे काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशात देखील चांगले फोटो येतातच...त्यासाठी बाहेर देशात जाण्याची ती गरज काय...तसेच दुसऱ्या युझर्सनं चांगल्या प्रतीचे मोबाईल वापरल्यास फोटो चांगले येतात. कॅमेरा क्लिअॅरिटी जास्त मॅटर करते असे म्हटले आहे. आपल्या घराच्या बाहेर असणाऱ्या सुर्यप्रकाशात देखील चांगले फोटो येतात. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT