Entertainment News : हेमांगी कवी (hemangi kavi) हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. नुकताच तिने इंस्टाग्राम अकाउंट वरून तिच्या आगामी चित्रपटांचे पोस्टर शेअर केले आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होणं ही आनंदाची बाब असली तरी यामागे दडलेली खंत तिने बोलून दाखवली आहे.
आपल्याला उत्तम कलाकृती मिळावी ती चालावी याच साठी प्रत्येक कलाकार मेहनत घेत असतो. बऱ्याचदा खूप मेहनत घेतल्यांनंतर तो चित्रपट प्रदर्शितच होत नाही. त्यामुळे हे अपयश पचवताना कलाकारांच्या वाट्याला अनेकदा नैराश्य येत. हे प्रकार मनोरंजन विश्वात सर्रास घडत असतात. पण हेमांगीच्या बाबतीत तर मोदी घटना समोर आली आहे. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या काळात वर्षात तिचे १३ चित्रपट प्रदर्शितच झालेले नाहीत. याबाबत ती आज व्यक्त केली आहे. (hemangi kavi on flim release)
हेमांगी म्हणते, 'प्रत्येक कलाकाराला वाटतं आपला सिनेमा superhit व्हावा, अगदी superhit वगैरे नाही झाला, निदान थोडा तरी चालावा. किती आनंद असतो त्यात. मला कश्याचा आनंद होतोय माहितेय? या वर्षी माझे सिनेमे किमान 'प्रदर्शित' तरी होतायेत याचाच. चित्रपट चालणं न चालणं खूप पुढची गोष्ट. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'पिपाणी' हा माझा 2012 साली प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा! त्या नंतर मी 'साहेब, अन्तर्दाह, पिज्जा- मुन्ने, चूक भूल द्यावी घ्यावी, वऱ्हाडी वाजंत्री, गडद जांभळ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्कूल चलें, बाहुलीचं लगीन, आणखी २-३ सिनेमे ज्याची नावं आता मला आठवत ही नाही, माझी मध्यवर्ती भूमिका असलेले असे १२ ते १३ सिनेमे चित्रीकरण पूर्ण होऊन वेगवेगळ्या कारणास्तव प्रदर्शितच झाले नाहीत! प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यात, कारकिर्दीत चित्रपट प्रदर्शित न झाल्याची अशी झळ बसलेली असते पण माझ्यासाठी ते १३ सिनेमे म्हणजे जरा जास्तच झळ बसलीय असं वाटतं'
'२०१३ ते २०१८ ची चित्रपटातली माझी ५ वर्ष जणू नाहीशीच झाली. पुसली गेली. खूप मन लावून, मेहनतीने या सगळ्या चित्रपटात कामं केली, वेळ दिला, energy लावली पण लोकांपर्यंत काही पोचलंच नाही. याचं दुःख किती मोठंय हे मी शब्दात सांगूच शकत नाही. २००८ ते २०१२ मध्ये माझे धुडगूस, पिपाणी, पारध, मनातल्या मनात, फक्त लढ म्हणा, पाच नार एक बेजार, डावपेच, कोण आहे रे तिकडे सिनेमे प्रदर्शित झाले. ते किती चालले हा वेगळा मुद्दाय पण निदान प्रदर्शनाचं भाग्य तरी लाभलं. मग थेट २०१८ ला 'सविता दामोदर परांजपे' आणि २०१९ ला 'सर्व लाईन व्यस्त आहेत' २ सिनेमे आले. भूमिका अत्यंत छोटी असली तरी निदान हे सिनेमे प्रदर्शित होतील याच एका खात्रीच्या आमिषाने केले,' अशी खंत हेमांगीने व्यक्त केली आहे.
'यावेळी मात्र एकाच वर्षी माझे 4 सिनेमे प्रदर्शित होतायेत याचा किती आनंद होतोय काय सांगू तुम्हांला? त्यातला 'पांडू' जरी मी त्यात पाहुणी कलाकार असले तरी वर्षाच्या सुरवातीलाच release झाला. ६ मे ला 'भारत माझा देश आहे' चित्रपट येतोय, २४ जून ला तमाशा Live येतोय. 'तिचं शहर होणं' राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतोय, तोही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आता या चित्रपटांचं काय भविष्य आहे ते वेळच ठरवेल. पण हे चित्रपट प्रदर्शित होतायेत यानेच 'आनंद पोटात माझ्या माईना' झालाय. खूप मस्त वाटतंय!' अशा शब्दात तिने आपल्या भावना चाहत्यांसमोर मांडल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.