Hemangi kavi shared post about her work Recap 2022 sakal
मनोरंजन

Hemangi kavi: २०२२ या वर्षात हेमांगीनं नेमकं केलं तरी काय? तिनंच सांगितलं सविस्तर..

अभिनेत्री हेमांगी कवीने एक पोस्ट शेयर करत या वर्षात तिच्या आयुष्यात काय काय घडलं ही सांगितलं आहे.

नीलेश अडसूळ

Hemangi Kavi: कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरणारी एक मराठी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती तिच्या कामामुळे प्रसिद्ध आहेच पण सोशल मीडियावर ती भलतीच सक्रिय पहायला मिळते. तिच्या पोस्टची कधी चर्चा होते तर कधी तिचे रील,व्हिडीओ चाहत्यांना हसवून जातात. ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. विशेष म्हणजे तिनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तरं देत अनेकदा त्यांची बोलती बंद केली आहे. नुकतीच हेमांगीनं एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये ती २०२२ मध्ये डोकावताना दिसत आहे. (Hemangi kavi shared post about her work Recap 2022)

या पोस्टमध्ये तिने २०२२ वर्ष तिच्यासाठी कसं होतं, तिने काय काय काम केलं, हे सविस्तर लिहिलं आहे. ती म्हणते, ''Recap 2022.. मागच्या वर्षातला कामाचा आढावा घेतला तर २०२२ ची सुरूवातच Colors Marathi च्या ’लेक माझी दुर्गा’ या मालिकेने झाली. जुलै १५ ला ‘तमाशा Live' प्रदर्शित झाला. ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय पातळींवर screening झालं. Awards मिळाली. या वर्षी लवकरच हा चित्रपट प्रर्दशित होईल. भारत माझा देश आहे आणि वऱ्हाडी वाजंत्री सारखे चित्रपट प्रर्दशित झाले.

''पाचव्यांदा USA वारी झाली! मुंबईच्या ताज मध्ये वाढदिवसानिमीत्त चहा पिण्याचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं! (हो, माझ्यासाठी ती achievement च आहे! वरूण नार्वेकर या माझ्या आवडत्या दिग्दर्शकाबरोबर एका webseries निमित्त काम करायला मिळालं. रवी जाधवांच्या ‘ताली’ या आणखी एका webseries मध्ये माझ्या प्रेरणास्थानी असलेल्या सुश्मिता सेन सोबत screen share करायची संधी मला मिळाली!''

''भाडिपा या अत्यंत मेहनती समुहा सोबत एका महत्वाच्या विषयावर YouTube साठी Docufilm केली. दोन जाहिराती केल्या. योग्य वेळी याबद्दल सविस्तर सांगेनच.
आणि वर्ष संपता संपता ‘Thanks Dear' सारखं अप्रतिम असं नाटक माझ्या वाट्याला आलं!
या सगळ्यात शारिरीक स्वास्थ्याकडे बारीक दुर्लक्ष झालं. तमाशा Live च्या अपयशामुळे थोडी निराशा झाली पण इतर वेगवेगळ्या projects मुळे ती नाहीशी झाली.''

''पण या सगळ्यात महत्वाचं मनाचं आरोग्य ते intact राहीलं! Social Media चं trolling मनावर घेतलं नाही. वाकड्या बोलण्याला जमेल तितकी सरळ उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. प्रर्दशित झालेल्या चित्रपटांच्या Box office status ने हिरमोड जरूर झाला पण खचून गेले नाही. चित्रपटाला व्यवसायिक यश नाही मिळालं तरी माझ्या कामाचं कौतुक झालं! काम करताना मौज आली पाहीजे हेच मनात होतं!''

''आज नविन वर्ष सुरू होतंय. मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी जे काम येईल त्याला १०० % न्याय द्यायचं ठरवलंय! तुमचं प्रेम, आशीर्वाद, लोभ असाच राहावा ही विनंती आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा Happy New Year!'' अशी पोस्ट हेमांगीने केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. तर तिच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT