Hemant Dhome Post...Kshanbhar Vishranti Movie location,memories..Alibag.. Instagram
मनोरंजन

Hemant Dhome: अलिबागच्या सासवणे गावाशी काय आहे हेमंत ढोमेचं नातं?, पोस्ट शेअर करत म्हणाला,'१६ वर्षांनी..'

१६ वर्षापूर्वी हेमंत ढोमे सासवणे गावात गेला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं याचा एक अविस्मरणीय किस्सा त्यानं शेअर केला आहे,

प्रणाली मोरे

Hemant Dhome: अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता म्हणून हेमंत ढोमे सर्वपरिचित आहेच..आणि नवीन वर्षात तर त्यानं स्वतःची चलचित्र मंडळी ही कंपनी देखील स्थापन केली आहे. या कंपनी अंतर्गत आता लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. त्यानं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच रितसर तशी पोस्ट करत घोषणाही केली.

आता पुन्हा त्यानं एक फोटो पोस्ट करत १६ वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली आहे. अलिबागच्या सासवणे गावचा फोटो शेअर करत भूतकाळातल्या गोड आठवणीत हेमंत ढोमे रमलाय. चला जाणून घेऊया त्या सासवणे गावाशी नेमकं काय नातं आहे हेमंतचं?(Hemant Dhome Post...Kshanbhar Vishranti Movie )

हेमंत ढोमेनं फोटो शेअर केला आहे त्यात खुप सुंदर निसर्ग दिसतोय. अर्थात अलिबागच्या सुंदर समुद्र किनाऱ्यालगतचा तो परिसर डोळ्यात चटकन भरुन जातो. त्यात अथांग समुद्राकडे तोंड करत हात मोकळ्या हवेत उंचावत चेहऱ्यावर मनमोकळं स्माइल देत उभा असलेला हेमंतही आपल्याला या आनंदामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लावून जातो. हेमंतच्या मागे फोटोत दिसणारा बंगलाही काहीसा ओळखीचा वाटेल आपल्याला. अर्थात हेमंतच्या आठवणी आलिबाग..सासवणे गाव आणि समुद्र किनाऱ्यालगत डौलात उभा असलेला हा बंगाला याच्याशीच जोडलेल्या आहेत बरं का.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हा बंगला जर आपण 'क्षणभर विश्रांती' हा सिनेमा पाहिला असेल तर चटकन आठवेल आपल्याला. मराठीतला मल्टीस्टारर सिनेमा 'क्षणभर विश्रांती'मधला ७० टक्के भाग या बंगल्यात शूट झालाय असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. सिद्धार्थ जाधव, मनवा नाईक, हेमंत ढोमे, पूजा सावंत, सचित पाटील,सोनाली कुलकर्णी, कादंबरी कदम अशी कलाकारांची मोठी टीम सिनेमात दिसलेली. मैत्रीच्या धाग्यात गुंफलेली ही कथा तेव्हा अनेकांना भावली होती. सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता या सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं या कलाकारांनी तिथे कल्ला केला असणार यात नवल नव्हे.

१६ वर्षांनी हेमंत पुन्हा त्या लोकेशनवर गेला अन् भूतकाळात डोकावला आणि त्यानिमित्तानं ही पोस्ट केली आहे. त्यानं आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहिलं आहे की,''अलिबाग मधल्या या लोकेशन वर बरोबर १६ वर्षांनी जाण्याचा योग आला! कमाल फिलींग!

‘क्षणभर विश्रांती’ मधला बंगला…

गाव - सासवणे!''

ही पोस्ट हेमंतनं आपल्या त्या सिनेमातील सगळ्या सहकलाकारांना टॅग करत याक्षणी तुमची खूप आठवण येतेय असं देखील म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT