Hemant Dhome’s tweet sharing photos of the Mumbai-Goa highway Esakal
मनोरंजन

Hemant Dhome: चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! ढोमेने शेअर केला मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांचा फोटोशूट

Vaishali Patil

Hemant Dhome’s tweet On Mumbai-Goa Highway: खराब रस्ते आणि त्यात जागोजागी तयार झालेले मोठमोठे खड्डे यांच्यामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीबरोबरच कलाकार मंडळी देखील या समस्येला सामोरे जात असतात. पावसाळ्यात तर या खड्ड्यांच्या समस्या जास्त प्रखरतेने जाणवतात.

अशातच सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर अनेकांनी भाष्य केलं आहे. आता त्यातच मराठमोळा अभिनेता हेमंत ढोमेने देखील मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमंतने त्याच्या सोशल मीडियावर मुंबई- गोवा महामार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्याचे काही फोटो शेअर करत एक हटके कॅप्शन शेयर पोस्ट केले आहे. या फोटोंना कॅप्शन देत त्याने लिहिलं की, 'चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो! आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!”.

या पोस्टमधुन त्याने मजेशीरपणे सरकारला टोला लगावला आहे. आपला संताप व्यक्त करत त्याने ही पोस्ट शेयर केली आहे. आता हेमंतची पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

त्याच्या ट्विटवर काहींनी त्याच्या भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो शेयर केले आहे. तर काहींनी त्याला पाठिंबा देत सरकारवर टिका केली आहे.

हेमंत ढोमे फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही लोकप्रिय आहे. हेमंत ढोमे सोशल मीडियावर खुप सक्रिय असतो. तो अनेकदा अशा काही पोस्ट शेयर करतो की त्याची जोरदार चर्चा रंगतेच.

तो अनेक अनुभव आणि काही मुद्यांवर त्याचे स्पष्ट मत मांडत असतो. त्यामुळे अनेकांचे लक्ष त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असते. अशातच आता पुन्हा हेमंतने केलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या पोस्ट देखील व्हायरल झाली आहे आणि नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.(Latest Marathi News)

हेमंत ढोमे हा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. सर्वात पहिला आणि गाजलेला चित्रपट म्हणजे 'क्षणभर विश्रांती'. या चित्रपटाची एक वेगळीच कथा होती. त्याच्या झिम्मा ने देखील बॉक्स ऑफिवर चांगली कमाई केली. आता त्याचा डेटभेट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT