Here’s Why Shah Rukh Khan Warned Aamir Khan To Not Work With Kajol Google
मनोरंजन

काजोलसोबत काम न करण्याचा जेव्हा शाहरुखनं आमिरला दिला होता सल्ला...

आमिरपेक्षा जास्त सिनेमा काजोलने शाहरुखसोबत केले आहे,जे जवळपास सर्वच सुपरहिट ठरले आहेत.

प्रणाली मोरे

अभिनेता शाहरुख खान(Shahrukh khan) आणि काजोलने(Kajol) आपल्या करिअर मध्ये कितीतरी सिनेमे एकत्र केले आहेत. शाहरुखसोबतच्या 'बाजीगर' सिनेमामुळे काजोलला खऱ्या अर्थानं प्रसिद्धि मिळाली. या जोडीला चाहत्यांचे इतके प्रेम मिळाले की मोठमोठ्या दिग्दर्शकांनी या दोघांना आपल्या सिनेमासाठी कास्ट केलं. 'बाजीगर','करण अर्जुन','दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे','कुछ कुछ होता है' पासून 'माय नेम इज खान' अशा अनेक सिनेमांतून दोघांनी एकत्र मिळून काम केलं आहे. एवढ्या सिनेमांतून एकत्र काम केल्यामुळे दोघांची मैत्री देखील घट्ट झाली. दोघांचे कुटुंबिय देखील एकमेकांच्या खूप जवळ आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का की एकदा शाहरुख खानने आमिर खानला(Amir Khan) काजोल खूप भाव खाते,चांगली मुलगी नाही,तु तिच्यासोबत काम करू नकोस असा सल्ला दिला होता. विश्वास बसला नाही नं तुमचा. पण हे असं झालं होतं,चला जाणून घेऊया तो सविस्तर किस्सा.(Shah Rukh Khan Warned Aamir Khan To Not Work With Kajol)

काजोल आणि शाहरुख खाननं पहिल्यांदा 'बाजीगर' सिनेमाच्या माध्यमातून एकत्र स्क्रीन शेअर केली. 'काजोल खूप घमेंडी आहे' असं सुरुवातीला शाहरुखला वाटलं होतं. एकदा शाहरुख खानने 'बाजीगर' सिनेमात पहिल्यांदा काजोल सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला होता. तो म्हणाला होता की,''मला पहिल्यांदा काजोलचा स्वभाव आवडला नव्हता''. नेमकं काय म्हणाला होता शाहरुख?

शाहरुख म्हणाला होता,''मी पहिल्यांदा जेव्हा काजोल सोबत काम करत होतो तेव्हा एकदा आमिर खाननं मला तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव विचारला होता. मी त्याला म्हणालो होतो,''काजोलचा स्वभाव चांगला नाही. ना तिचं कामावार नीट लक्ष आहे,ना तू तिच्यासोबत काम करु शकतोस''. आमिरला काजोलसोबत काम करायचे होते,आणि तिच्यासोबत काम करण्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यावेळी आमिरनं शाहरुखला फोन केला होता. त्यावेळी शाहरुख खाननं काजोलविषयी आमिरला चांगलं सांगितलं नव्हतं. त्यानं थेट काजोलसोबत काम न करण्याचा सल्ला आमिरला दिला होता.

त्यानंतर जेव्हा 'बाजीगर' सिनेमाचं शूटिंग पू्र्ण झालं आणि शाहरुख खानने काजोलला स्क्रिनवर पाहिलं तेव्हा शाहरुख पाहतच राहिला. त्यानं दुसऱ्या क्षणाला आमिरला फोन केला आणि त्याला काजोलविषयी चुकीचा सल्ला दिल्याचं मान्य केलं.त्यानं मिस्टर परफेक्शनिस्टला म्हटलं ,''मला माहित नव्हतं की काजोलकडे अभिनयाची जादू आहे. ती जेव्हा स्क्रीनवर येते तेव्हा खरंच समोरच्याला मंत्रमुग्ध करते''.

शाहरुख खानच्या त्या सल्ल्याला मग आमिरनही मान्य केलं. आणि हेच कारण आहे की आमिर खान आणि काजोलचा पहिला सिनेमा 'फना' २००६ मध्ये प्रदर्शित झाला. काजोल सोबत काम करण्यासाठी आमिर खानला १६ वर्ष वाट पहावी लागली. पण दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला लोकांनी देखील पसंत केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मकबा हाईट्समध्ये रात्री बैठक अन् माझ्या राजसाहेबांना फसवलं... वांद्रेत मोठी सेटलमेंट? मनसेत खळबळ माजवणारा गौप्यस्फोट

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा 'या' दिवशी होणार

Mahayuti: बंडोबांना थंड करण्यात महायुतीला येणार का यश? अन्यथा 'या' मतदारसंघात बसू शकतो फटका

Narak Chaturdashi 2024: 30 कि 31 ऑक्टोबर कधी आहे छोटी दिवाळी? काय करावे अन् काय करू नये? वाचा एका क्लिकवर

Mumbai Vidhansabha: मुंबई उपनगरात ३२४ उमेदवार मैदानात

SCROLL FOR NEXT