बॉलीवूडचं सर्वात मोठं चर्चेतलं लग्न अखेर लवकरच होत आहे. अशा बीटाऊनच्या हीट कपल्सच्या म्हणजे आलिया भट्ट (Alia Bhatt)आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. तर वाचकहो,या ऱॉयल वेडिंगच्या सुरक्षेविषयी आपण जाणून घेणार आहोत.
रॉयल वेडिंगमध्ये दिसणार तगडी सुरक्षाव्यवस्था
२०२२ चं हे सगळ्यात मोठं सेलिब्रिटी लग्न आहे बॉलीवूडमधलं,तर मग सुरक्षाव्यवस्थाही तगडी असणारच नाही का. आलिया-रणबीरच्या लग्नाच्या प्लानिंगची जबाबदारी 'शादी स्क्वॉड' कंपनीला देण्यात आली आहे. 'शादी स्क्वॉड' कंपनी मोठी मेहनत घेऊन या बड्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,'वास्तु' इमारत जिथे रणबीर राहतो तिथे लग्नात फक्त त्याच लोकांना एन्ट्री मिळणार आहे,ज्यांच्याकडे ऑरेंज कलरचा बॅंड असेल. ज्यांनी तो बॅंड हातात घातला नसेल त्यांना इमारतीच्या आत प्रवेश नाकारला जाईल.
आलियाच्या व्यस्त शेड्युलमुळे,रणबीर देणार दोन रीसेप्शन पार्टी
कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे आलिया-रणबीरच्या लग्नात कोणीही चोरुन फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी पोहोचू शकणार नाही. इतकंच नाही,तर इव्हेंट कंपनीनं रणबीर कपूरच्या 'वास्तू' इमारतीला चारही बाजूंनी सफेद कापडानं झाकलं आहे. कारण जर कुणी बाहेरुन फोटो किंवा व्हिडीओ शूट करायचा प्रयत्न केला तर त्यांना तसं करता येणार नाही. वाह!इव्हेंट कंपनीनं चागलंच डोकं चालवलं आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाआधी शादी स्क्वॉड कंपनीनं कतरिना-विक्की आणि फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या लग्नातही चोख भूमिका बजावली होती.
तुर्तास मिळालेल्या माहितीनुसार,रणबीर कपूर आणि आलिया भट्ट चं लग्न रणबीरच्या 'वास्तु' इमारतीतील घरात होणार आहे. याआधी हे कपल 'आरके हाऊस'मध्ये लग्न करणार होतं. पण अचानक आता शेवटच्या क्षणाला लग्नाचं स्थळ बदलण्यात आलं आहे. या दोघांच्या लग्नाचं रीसेप्शन दोन वेळा होणार आहे. १५ एप्रिलला लग्नाच्या नंतर १६ आणि १७ एप्रिलला कुलाबा स्थित ताज महल पॅलेस मध्ये हे ग्रॅंड रीसेप्शन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.