Cannes Film Festival : कान्स चित्रपट महोत्सव हा जगातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे. यावर्षी फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये 16 मेपासून या महोत्सवाला सुरुवात झाली. 27 मे पर्यंत चालणाऱ्या 76 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वेळी अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर दिसत आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा कान फिल्म फेस्टिव्हलशी संबंध होता. शिवाय हा महोत्सव सुरू होण्यामागे त्याचा आणि इटलीचा हुकूमशहा मुसोलिनी यांचा सहभाग होता.
कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि हिटलर कनेक्शन
1938 मध्ये हिटलर आणि मुसोलिनी यांनी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल सुरू केला जेणेकरून ते त्यांच्या आवडत्या लोकांना पुरस्कार देऊ शकतील. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलच्या अनेक ज्युरी सदस्य त्यांच्याशी सहमत नव्हते. हिटलर-मुसोलिनी जोडीचा निषेध करत अनेक सदस्यांनी राजीनामे दिले. यानंतर या लोकांनी फ्री फेस्टिवल सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फ्रान्सचे कान हे ठिकाण निवडले गेले.
हिटलरमुळे उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला
कानमध्ये झालेल्या या चित्रपट महोत्सवाला फ्रेंच सरकारचाही पाठिंबा मिळाला. फ्रेंच सरकारने हा अधिकृत कान चित्रपट महोत्सव म्हणून घोषित केला. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाची तारीख 1 सप्टेंबर 1939 ही ठेवण्यात आली होती. तो यशस्वी करण्यासाठी एक दिवस अगोदर 30 ऑगस्ट रोजी गाला नाइटचे आयोजन करण्यात आले होते.
जगभरातील सेलिब्रिटींनी यात सहभाग घेतला होता. पण हिटलरने पोलंडवर 1 सप्टेंबर 1939 रोजी हल्ला केला. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा 10 दिवस पुढे ढकलावा लागला. दरम्यान फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये युद्ध सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धामुळे कान महोत्सव 6 वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आला.
पहिला कान चित्रपट महोत्सव कधी सुरू झाला?
दुसरे महायुद्ध संपल्यानंतर 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 1946 या कालावधीत कान चित्रपट महोत्सव प्रथमच यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. यामध्ये 20 हून अधिक देश सहभागी झाले होते. या महोत्सवाविषयी सांगायचे तर जगभरातील निवडक चित्रपट आणि माहितीपट दाखवले जातात.
या चित्रपट महोत्सवाशी भारताचेही विशेष नाते आहे. 1950 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांना आंतरराष्ट्रीय ज्युरी सदस्य बनवण्यात आले. 76 व्या कान चित्रपट महोत्सवात भारताचा कंट्री ऑफ ऑनर म्हणून समावेश करण्यात आला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.