मुंबई - जगभरात ज्याचा चाहतावर्ग आहे अशा टॉम क्रुझची Tom Cruise’s BMW गोष्टच वेगळी आहे. सोशल मीडियावर social media त्याला लाखो फॅन फॉलोअर्स आहेत. त्याच्या चित्रपटाची पारायणं केलेल्यांची संख्याही काही कमी नाही. सध्या तो त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होता. त्यावेळी त्याला मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. त्या दरम्यान त्याची बीएमडब्ल्यु चोरीला गेल्याची घटना घडल्याचे दिसून आले आहे. त्याचं काय आहे. टॉमच्या एम आय ७ चं शुटींग सध्या बर्मिंगहॅममध्ये सुरु आहे. त्याविषयी सोशल मीडियावरही बोललं जात आहे. मात्र टॉमच्या बाबत घडलेल्या प्रकारामुळे सगळ्यांच लक्ष टॉमकडे Tom Cruise’s BMW वेधलं गेलं आहे.
जेव्हा त्याच्या या चित्रपटाची शुटींग सुरु होती तेव्हा त्याची महागडी बीएमडब्ल्यु चोरीला गेल्याची धक्कादायक गोष्ट चोरीला गेली आहे. त्याचा हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एम आयच्या सातव्या भागाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी एम आयच्या वेगवेगळ्या भागांना देखील प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. टॉमला आपली आवडती बीएमडब्ल्यु चोरीला गेल्याचे कळले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यानंतर त्यानं पोलिसांकडे याबाबत तक्रारही दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्याची नुसतीच गाडी नाही तर त्यात असलेली बॅगही चोरीला गेली आहे. ज्यात एक लाख पौंड होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
बीएमडब्ल्यु एक्स ७ नावाचे ते मॉडेल होते. त्याची कार ही बर्मिंगहॅममधील एका हॉटेलबाहेर लावली होती. जेव्हा हा लोकप्रिय अभिनेता हा त्याच्या नावाजलेल्या एम आय सीरिजमधल्या पुढील भागाचं शुटींग करत होता तेव्हा ही धक्कादायक घडल्याचे टॉमनं सांगितलं आहे. याप्रकारानं टॉमला धक्का बसला आहे. तो त्यातून अद्याप सावरलेला नाही. आपल्याला हा प्रकार कसा घडलाय, याबाबत आपण पूर्णत; अनभिज्ञ असल्याचे त्यानं सांगितलं आहे.द सन नावाच्या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, ज्या चोरांनी कार चोरली त्यांनी एक स्कॅनर मशीन वापरले होते. त्याच्या आधारानं त्यांनी कार चोरी केली आहे. टॉमची गाडी एका हॉटेलच्या बाहेर पार्क करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.