अमेरिकन गायक जेरी ली लुईस आता या जगात नाही. जेरी ली लुईस यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते दिर्घ काळापासून आजारी होते. लुईस यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संगीत क्षेत्रात खळबळ उडाली होती मात्र ती अफवा असल्याचे सांगितले जात होते अखेर आज याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
अमेरिकन रॉक पायनियर म्हणुन ओळख असलेल्या जेरी ली लुईस यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. जेरी “ग्रेट बॉल्स ऑफ फायर” आणि "होल लोटा शकिन' गोइन' ऑन" सारख्या हिट गाण्यासाठी ओळखले जाते. जेरी ली लुईस यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. 2019 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यानंतर ते आजारीच होते.
जेरी ली लुईस त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप प्रसिद्ध होता. 1950 मध्येही जेरी खूप चर्चेत आले होते. जेरी ली लुईसने रॉक रिबेल बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेरीने अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत.जेरींचे गाणे त्याच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध होती. त्याची शैली सर्वांनाच आवडायची. त्याची फॅन फॉलोइंगही खूप तहडी होती. जेरीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
जेरी ली लुईसची कारकीर्द 1958 मध्येच संपली. त्यामागचं सर्वात मोठे कारण हे त्याचं लग्न ठरलं. खरं तर त्यानं आपल्याच 13 वर्षांच्या चुलत बहिणीशी लग्न केले होतं. याशिवाय तो आधीच विवाहित होता. ही बातमी समोर आल्यानंतर याचा मोठा परिणाम त्याच्या करिअरवर परिणाम झाला. त्याचे शो रद्द होत होते. एवढेच नाही तर त्याला रेडिओवरून ब्लॅक लिस्ट करण्यात आलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.