Amber Heard esakal
मनोरंजन

Amber Heard: नवऱ्याला भरपाई द्यायची वेळ आली, आता कमी झाला तोरा!

युगंधर ताजणे

Hollywood News: हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पत्नी एंबर हर्डचा आता घटस्फोट झाला आहे. या दोन्ही सेलिब्रेटींना न्यायालयानं एकमेकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. पत्नी एंबरनं जाणीवपूर्व, पद्धतशीरपणे (Hollywood celebrity) जॉनच्या बदनामीचा कट केल्याचे काही पुराव्यांमधून दिसून आले आहे. अशाप्रकारे तिनं जॉनचा मानसिक छळ केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे येत्या काळात काही रक्कम (johnny depp) जॉनीला द्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यासगळ्यात आपल्याला जॉनीला नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम द्यावी लागणार असे कळताच एंबरनं वेगळचं नाटक सुरु केलं आहे. (Social media viral news)

काही दिवसांपूर्वी जगभरामध्ये ज्या हॉलीवूड सेलिब्रेटींच्या घटस्फोटाची चर्चा सुरु (Hollywood Actor) होती त्यात जॉनी डेप आणि एंबर हर्डच्या नावाचा समावेश होता, साऱ्या जगानं त्यांच्या घटस्फोटाच्या खटल्याची सुनावणी लाईव्ह पाहिली. अशावेळी एंबरनं जे काही आरोप केले होते ते साऱे खोटे असल्याचे न्यायालयाला दिसून आले. याप्रसंगी एंबरनं जॉनीच्या वकीलावर देखील काही आरोप केले होते. एंबर आता जॉनीला पैसै देण्यासाठी एका मॉलमध्ये काही कपड्यांची खरेदी करताना दिसत आहे. जे कपडे अतिशय कमी किंमतीत मिळतात.

जेव्हापासून एंबर जॉनीविरुद्धचा खटला हारली तेव्हापासून तिनं आता सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट शेयर करण्यास सुरुवात केली आहे. त्यात एंबर ही एका मॉलमध्ये काम करत असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एंबर हे सगळं का करत आहे असा प्रश्न जेव्हा तिला विचारण्यात आला तेव्हा तिनं जॉनीला पैसे द्यायचे आहे म्हणून हे काम करावे लागत असल्याचे म्हटले आहे. नेटकऱ्यांनी एंबरला त्या पैशांवरुन खूप ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आरोप करताना तुझ्याकडे पैसे होते आता ते का नाही, आता बरी तू छोट्या मॉलमध्ये येवून कपडे घेत आहेस, कुठे गेला आता तुझा तोरा, ज्याप्रमाणात तू पैशांची उधळपट्टी करत होतीस आता ती नाही कारण तुला जॉनीला पैसे द्यायचे आहेत. अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT