Hollywood star Rosena Christiansen : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रोसेना क्रिस्टियनसेन यांचे निधन झाले आहे. त्या 71 वर्षांच्या होत्या. आपल्या हटक्या शैलीतील अभिनयामुळे रोसेना या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. सोशल मीडियावर देखील कायम चाहत्यांच्या चर्चेत असणाऱ्या या सेलिब्रेटीनं करिअरची सुरुवात मालिकांपासून केली होती. त्यांच्या काही व्यक्तिरेखा या अजुनही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक बड्या कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
कॅलिफॉर्नियातील लँकेस्टरमध्ये त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या जाण्यानं हॉलीवूडम मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या चिरतरुण अभिनयानं त्यांनी मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग तयार केला होता. त्यांच्या अभिनयाचे चाहते जगभर पसरले आहेत. रोसेना यांच्या निधनाची बातमी त्यांचे पती स्टीव्हन रिजो यांनी माध्यमांना दिली आहे. काही विदेशी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रोसेना या गेल्या महिन्यात (Dallas) कालवश झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्यांच्या निधनाचे वृत्त चर्चेत आले आहे.
रोसेना यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 1982 ते 1991 पर्यत त्यांनी डल्लास या मालिकेतून टेरेसा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच भूमिकेसाठी त्यांना जगभरात ओळखले जाते. गेल्या वर्षी त्या मालिकेच्या सहाव्या पर्वात सहभागीही झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर 1991 पर्यतच्या 14 सीझनपर्यत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले होते. या मालिकेचे एकुण 9 सीझन असून त्यांच्या एपिसोडची संख्या 112 एवढी आहे.
त्यांच्या करिअरविषयी सांगायचे झाल्यास त्या प्राईमटाईम शो डलासमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिथून त्यांच्या करिअरचा आलेख हा नेहमीच उंचावत राहिला. त्यानंतर 1981 मध्ये आलेल्या द जेफरसन नावाच्या मालिकेत देखील त्यांनी केलेल्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूक झाले होते. एक लोकप्रिय अभिनेत्री आणि सामाजिक कामात सक्रिय सहभाग घेणाऱ्या समाजसेविका म्हणून त्यांना मान होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.