'कांतारा' या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसंच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे.
मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेला दक्षिण दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. रिलीज झाल्यानंतर, लोकांमध्ये या चित्रपटाची खूप क्रेझ होती. यामुळं या चित्रपटानं केवळ दक्षिणेतूनच नव्हे, तर हिंदी भाषेतही भरपूर कमाई केली.
'कांतारा' चित्रपटाला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं. हा चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे. अमित शहांनी नुकताच हा चित्रपट पाहिल्याचा खुलासा केला. कर्नाटकात 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी अमित शहा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर इथं एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. इथं त्यांनी 'कांतारा'चं तोंडभरुन कौतुक केलं.
धार्मिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा दक्षिण कन्नड जिल्ह्यात आढळतात. मी नुकताच 'कांतारा' पाहिला आणि कांतारा पाहून मला कळलं की, हे राज्य परंपरांनं किती समृद्ध आहे. 'कांतारा' हा चित्रपट दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या संस्कृतीची ओळख आहे, असं सांगत शहांनी चित्रपटाचं कौतुक केलं.
2022 मधील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये कांताराचं नाव समाविष्ट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषभ शेट्टीनंच केलं, शिवाय तो या चित्रपटाचा मुख्य अभिनेताही होता. या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम नोंदवले. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.
'कांतारा' या बहुचर्चित सिनेमाचं लेखक, दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केलं आहे. तसंच या सिनेमात त्याच्या अभिनयाची जादूदेखील पाहायला मिळाली आहे. आता या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा करत ऋषभ शेट्टी म्हणाला, "कांतारा' या सिनेमावर प्रेम केल्याबद्दल सर्वच प्रेक्षकांचे खूप खूप आभार. कांतारा' सिनेमात जे होतं तो कथानकाचा दुसरा भाग आहे. या वर्षात (2023) या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कांतारा'च्या शूटिंगदरम्यानच या सिनेमाच्या प्रीक्वलबद्दल मी विचार करत होतो. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. लवकरच सिनेमासंदर्भात अधिक माहिती देईल".
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.