House Of Dragons now streaming  esakal
मनोरंजन

House Of Dragons: जगप्रसिद्ध 'गेम ऑफ थ्रोन्स' लिहिणारा 'मार्टिन' आहे कोण?

तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे वेब मालिकेच्या दुनियेत आतापर्यत सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या मालिकेत गेम ऑफ थ्रोन्स मालिकेचे स्थान सर्वोच्च आहे.

युगंधर ताजणे

House Of Dragons: तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे वेब मालिकेच्या दुनियेत आतापर्यत सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या मालिकेत गेम ऑफ थ्रोन्स मालिकेचे स्थान सर्वोच्च आहे. सर्वोत्तम वेबसीरिजसाठी मालिकेसाठी जे (tv Entertainment News) पुरस्कार दिले जातात ते सर्वच या मालिकेनं आपल्या नावावर केले आहे. जॉर्ज आर आर मार्टिनं याच्या गेम ऑफ थ्रोन्स या कादंबरी मालिकेवर आधारित त्याच नावाच्या मालिकेनं लोकप्रियतेचा इतिहास घडवला आहे. जेव्हा मार्टिननं या कादंबऱ्यांचे लेखन केले तेव्हा त्याला त्यावर आपण (Social media Viral News) चित्रपट तयार करावा असे वाटले. तो काही निर्मात्यांना भेटलाही होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला होता.

तू जे काही लिहिले आहेस ते सर्वोत्तम असेच आहे. भन्नाट आहे वाचायला तर भारी वाटते. मात्र ते पडद्यावर आणण्यासाठी जो खर्च आहे तो अफाट आहे. तेव्हा तो खर्च करण्याची आपली काही तयारी नाही. अशी उत्तरं त्याला ऐकायला मिळाली. मात्र मार्टीन काही खचला नाही. त्यानं प्रयत्न सुरुच ठेवला. तुम्हाला हॅरी पॉटर या कादंबरीची लेखिका जे के रोलिंगची गोष्ट माहिती असेलच. आपलं कथानक घेऊन ती आठपेक्षा जास्त प्रकाशकांकडे ती गेली होती. तिला त्यांनी नकार दिला. मात्र जेव्हा एका प्रकाशकानं ती कथा प्रकाशित केली तेव्हा ज्यांनी रोलिंगला नकार दिला होता त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली होती. वाचकांनी रांगा लावून तिच्या कादंबऱ्या विकत घेतल्या होत्या.

रोलिंगच्या बाबतीत जे घडलं तेच मार्टिनच्या बाबतही झालं. तो प्रचंड आत्मविश्वासी आणि मेहनती होता. गेम ऑफ थ्रोन्स मालिका ज्यांनी पाहिली असेल त्यांना त्या कथेचा अवाका आणि कलाकृती तयार करण्यासाठी कशाप्रकारची मेहनत लागली असेल याचा अंदाज येईल. जॉर्ज रेमंड रिचर्ड मार्टिनचा जन्म २० सप्टेंबर १९४८ मधला. अमेरिकेतल्या न्यू जर्सी मध्ये त्याचा जन्म झाला. त्याचे वडील एक गोदी कामगार होते. घरची परिस्थिती हलाखीची. हे कुटुंब जॉर्जच्या पणजीच्या घरात राहायचं. तिथून सरकारी स्कीममध्ये मिळालेल्या एका छोट्याशा घरात ते रहायला गेले. लहानपणापासूनच जॉर्जला बाहेरच्या जगाच खूप आकर्षण होतं. त्यावेळी त्याला मनोरंजनाचे एकच साधन होते. ते म्हणजे पुस्तकं. जॉर्जनं पुस्तकांचा फडशा पाडण्यास सुरुवात केली. तो सदानकदा पुस्तकात गढलेला दिसायचा.

Game of thrones

जॉर्जने लहानपणीच आपल्या स्टोरीमध्ये एक राज्य तयार केलं. त्यात तो त्याच्या मनानं वेगवेगळे रंग भरत होता. भविष्यात आपल्या हातून काय निर्माण होणार आहे याची त्याला कल्पनाही नसावी. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने शिक्षणक्षेत्रात काही काळ नोकरीही केली. आवड म्हणून छोट्या मोठ्या मासिकात वैज्ञानिक कथा त्यानं लिहिल्या. यासगळ्यात आपण एक स्टोरीटेलर आहे. याची त्याला जाणीव झाली. आणि त्यानं वेगळ्या लेखन कक्षेत प्रवेश केला. ज्यामुळे त्याच्याहातून एक वेगळचं विश्व नजरेसमोर आलं. जॉर्जला ट्वालाईट झोन, ब्युटी अँड बीस्ट अशा टीव्ही सिरीयलचं स्क्रिप्ट लिहिण्यासाठी विचारण्यात आलं होतं.

Game of thrones

जॉर्जचं गेम ऑफ थ्रोन्स पुस्तक प्रचंड गाजलं. एका पुस्तकात ती कथा सांगून होईल असा अंदाज बांधलेल्या जॉर्जपुढील आव्हानं आणखी वाढली. त्यानं सात खंडात आपलं कथाविश्व वाचकांसमोर सादर केलं. क्लॅश ऑफ किंग्स, स्टोर्म ऑफ स्वोर्ड्स त्यानंतर फिस्ट ऑफ क्रोज. हे चौथ पुस्तक येईपर्यंत जॉर्ज जगप्रसिद्ध लेख झाला होता. सध्या त्याची हाऊस ऑफ ड्रॅगन नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्याचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेम ऑफ थ्रोन्स हा प्रीक्वेल असल्याचे सांगण्यात येते. ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्स पाहिला आहे त्यांच्यासाठी ही मोठी मेजवानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT