Jay Dudhane Google
मनोरंजन

जय दुधाणेच्या घरी कशी पोहोचली बिग बॉस विनरची ट्रॉफी? काय घडलं नेमकं..

ट्रॉफी सोबत बिग बॉसच्या उपविजेत्याने आपल्या कुटुंबासोबत केलं सेलिब्रेशन

प्रणाली मोरे

'बिग बॉस सिझन ३' चा उपविजेता ठरला आहे जय दुधाणे(Jay Dudhane). विजेत्या विशाल निकमला जय दुधाणेनं शेवटपर्यंत काटें की टक्कर दिली आहे. जय दुधाणे हा 'स्प्लिटव्हिला' या रिअॅलिटी शो चा विजेता आणि 'रोडीज' या रीअॅलिटी शो चा स्पर्धक असल्याकारणानं त्याच्याकडे बिग बॉस ३ चा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. घरात आल्यापासूनच त्यानं घेतलेला आक्रमक पवित्रा हा काहीजणांना खटकणारा वाटला तरी काही जणांना त्याचा हाच आक्रमक पवित्रा आवडायला लागला होता. त्यानं टास्कमध्ये दाखवलेली खिलाडूवृत्ती देखील दरवेळेला सर्वात सरस ठरत होती. पण गणित कुठे चुकले माहीत नाही अनं जय दुधाणेकडून बिग बॉसचं विजेतेपद थोडक्यासाठी हुकलं.

अखेर 'बिग बॉस ३' चा विनर 'खरा माणूस' विशाल निकम ठरला. जयकडून विजेतेपद हुकलं असलं तरी इन्स्टाग्रामवर जयनं काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्या फोटोत त्याच्या हातात बिग बॉसच्या ट्रॉफी सारखी हुबेहूब ट्रॉफी दिसत आहे. अर्थात ही कमाल आहे केक बनवणा-याची बरं का. म्हणजे जयच्या कुटुंबियांनी तो घरी परत येण्याच्या खुशीत एका सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी त्यांनी खास बिग बॉसच्या ट्रॉफी सारखा हुबेहूब दिसणारा केक आणला होता. जयच्या हातात खरी ट्रॉफी आली नसली तरी ही ट्रॉफीची प्रतिकृती त्याच्या हातात मात्र शोभून दिसतेय.

जय ने केलेल्या या व्हिडीओ पोस्टवर लोकांनी त्याचं खूप कौतूक आणि अभिनंदन केलंय. काही जणांनी म्हटलंय,'आमच्यासाठी तूच खरा विनर आहेस'. तर कुणी म्हटलंय,'सगळंच मिळालं तर लढण्याची इच्छा संपून जाईल'. सोशल मीडियावरील जयला मिळालेल्या कमेंट्स पाहून तरी नक्कीच वाटतंय की बिग बॉसमुळे जयच्या फॅन फॉलॉईंगमध्ये नक्कीच कमालीची वाढ झालीय आणि ही चाहत्यांची कमाई त्याला पुढील आयुष्यात नक्कीच फायद्याची ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT