how gashmeer mahajani stand with father in critical situation fathers day 2023  SAKAL
मनोरंजन

Father's Day 2023: वडिलांची फसवणूक, घरावर जप्ती, लाखोंचं कर्ज.. गश्मीरने वडिलांचा भार घेतला डोक्यावर

फादर्स डे निमित्ताने असाच एक किस्सा जाणून घेऊ. ज्यावेळी वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीर महाजनी वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी पुढाकार घेतला.

Devendra Jadhav

Father's Day 2023 Gashmeer Mahajani News: आज फादर्स डे. सर्व बापमाणसांचा दिवस. आपला बाप आपल्यासाठी कळत नकळतपणे अनेक गोष्टी करत असतो. अनेक गोष्टींची तडजोड करत असतो. आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे.

अनेकदा हा बाप घराचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेतो. पण हेच याच बापावर संकट कोसळतं तेव्हा मात्र मुलाने बापाला साथ द्यायची असते.

आज फादर्स डे निमित्ताने असाच एक किस्सा जाणून घेऊ. ज्यावेळी वयाच्या १५ व्या वर्षी गश्मीर महाजनी वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी पुढाकार घेतला.

(how gashmeer mahajani stand with father in critical situation fathers day 2023 )

गश्मीरचे वडील रवींद्र महाजनी हे लोकप्रिय अभिनेते आहेत हे आपल्याला ठाऊक आहे. रवींद्र महाजनी यांनी मराठी मनोरंजन विश्वात एक काळ गाजवला आहे.

रवींद्र हे मराठी मनोरंजन विश्वातले जुन्या काळातले एक हँडसम अभिनेते म्हणून ओळखले जातात. गश्मीर अनेकदा त्याच्या बोलण्यातून वडिलांविषयी असलेला आदर आणि प्रेम दाखवत असतो.

रवींद्र महाजनींची फसवणूक

अभिनय क्षेत्रासोबत जोडीला काही वेगळा व्यवसाय असावा, उत्पन्नाचं साधन असावं म्हणून रवींद्र महाजनी यांनी बांधकाम क्षेत्रात पार्टनरशीप केली.

परंतु या क्षेत्रात रवींद्र महाजनी यांची मोठी फसवणूक झाली. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राहत्या घरावर जप्ती आली. गश्मीरची आई त्यावेळी अगदी मोजक्या पगाराची नोकरी करत होती.

गश्मीरने उचलला घराचा आर्थिक भार

गश्मीरने अशावेळी डगमगून न जात कुटुंबाला साथ द्यायचं ठरवलं. गश्मीरने घरावरचा आर्थिक भार आणि कर्ज दूर करण्यासाठी स्वतःची डान्स अकादमी सुरु केली.

गश्मीर त्यावेळी अवघ्या १५ वर्षांचा होता. याशिवाय नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये पैशांसाठी गश्मीरने मिळेल ती भूमिका करायचं ठरवलं. २ वर्षात गश्मीरने डान्स क्लासचा जम बसवला आणि घरावरचं सगळं कर्ज फेडलं.

पुढे गश्मीर यशस्वी अभिनेता आला आणि त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. एकूणच फादर्स डे निमित्त गश्मीरने बापाची आणि संपूर्ण घरासाठी केलेली ही कृती कौतुकास्पद आणि प्रेरणादायी म्हणता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT