सतत आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटर या अॅपला थेट धमकी दिली आहे. मी लवकरच ट्विटर हे अॅप सोडणार असून आता कू अॅपवर माझं अकाऊंट उघडणार असल्याचं तिने नेटकऱ्यांना सांगितलं आहे. याबद्दल सांगताना कंगनाने ट्विटरलाच खडेबोल सुनावले आहेत. काही ड्रग अॅडिक्ट असलेले लोक इतरांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असं ती म्हणाली.
ट्विटर सेफ्टीच्या एका ट्विटवर उत्तर देताना कंगनाने थेट अकाऊंट बंद करणार असल्याची धमकी दिली. 'ट्विटर तुझी वेळ संपली आहे. आता kooapp कडे वळण्याची वेळ आलीये. लवकरच मी सर्वांना माझ्या अकाऊंटची माहिती देईन. देशात विकसित झालेला kooapp वापरण्यासाठी मी फार उत्साहित आहे', असं तिने तिच्या या नवीन ट्विटमध्ये म्हटलंय.
kooapp काय आहे?
Koo हे ट्विटरसारखंच अॅप असून जवळपास दहा महिन्यांपूर्वी त्याला लाँच करण्यात आलं होतं. या अॅपला आत्मनिर्भर अॅप चॅलेंजचा पुरस्कार मिळाला आहे. या अॅपला अपारमेय राधाकृष्ण आणि मयांक बिडावाटका यांनी विकसित केलंय. हिंदी, तेलुगू, कन्नड, बंगाली, तमिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, आसामी अशा विविध भाषांमध्ये या अॅपची सेवा उपलब्ध आहे.
ज्या ज्या सुविधा ट्विटरवर देण्यात आल्या आहेत, त्याच सर्व या नवीन अॅपवर देण्यात आल्या आहेत. यावर तुम्ही तुमची मतं मांडू शकता, अपडेट्स टाकू शकता, सेलिब्रिटींना फॉलो करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.