The Kerala Story  esakal
मनोरंजन

The Kerala Story: असाच नाही केला 'द केरळ स्टोरी' घेतली बक्कळ फी! जाणुन घ्या कलाकारांनी किती पैसे घातले खिशात

Vaishali Patil

The Kerala Story Star Cast Fees: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'द केरळ स्टोरी' रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत आणि शनिवारी चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे.

विपुल शाह प्रॉडक्शनने हा चित्रपट प्रोपगंडा वाटत होता त्यांनाही आश्चर्यचकित केले आहे. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये ही कमालीची वाढ झाली आहे. 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सकनिल्‍कच्‍या सुरुवातीच्या ट्रेडनुसार, अदा शर्मा स्टारर चित्रपटाने दोन दिवसांत 12.50 कोटींच्या जवळापास कमाई केली आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलर रिलिज झाल्यानंतर या चित्रपटाच्या कथानकावरून बराच गदारोळ झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालाण्याची तर काही ठिकाणी हाकरमुक्त करण्याची मागणी केली जात होती.

तर या चित्रपटात 'द केरळ स्टोरी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्रींबद्दल सांगायच झालं तर द केरळ स्टोरीमधील कलाकार अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्दी इदनानी यांनी दमदार भूमिका केल्या आहेत.

या नवोदित अभिनेत्रींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र त्यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी किती रक्कम घेतली माहिती आहे का? या चित्रपटातील कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं आहे ते एकदा वाचाच.

'द केरळ स्टोरी' या चित्रपटात बी टाऊनची सुपरस्टार अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अदा शर्मानं जी भोळ्या भाबड्या फातिमाची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आहे. बॉलीवूड लाईफमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अदा शर्माने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटासाठी एक कोटी रुपयांची तगडी रक्कम घेतली आहे.

तर बाकिच्या तिनही सहकलाकारांनी हा चित्रपट करण्यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये फी घेतली आहे.तर 'द केरळ स्टोरी'मध्ये अभिनेता विजय आचार्य याने देखील महत्वाची भमिका साकरली आहे. या भूमिकेसाठी विजयने 25 लाख रुपये फी म्हणून घेतली आहे. मात्र या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT