Amitabh Bachchan, Dharmendra And Hrishikesh Mukherjee esakal
मनोरंजन

हिरो कसे बनाल?, असे म्हणत ऋषीकेश मुखर्जी बच्चन अन् धर्मेंद्रावर रागावले

तुम्हा लोकांना स्टोरीचा सेन्स नाही. मग हिरो कसे बनाल?

सकाळ डिजिटल टीम

ऋषीकेश मुखर्जीला चित्रपट निर्माता कम हेडमास्तर मानले जात होते. वर्ष १९७५ मध्ये आलेल्या चुपके-चुपके चित्रपटातील एका सीनमध्ये ते धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यावर रागावले होते. याविषयी खुलासा आसरानी यांनी केला होता. आसरानी म्हणाले होते, ऋषिकेश सर्वांना सूचना देत आणि फटकारतही होते. त्यांनी बिग बी आणि धर्मेंद्र यांनाही सोडले नव्हते. खरे पाहाते धर्मेंद्र (Dharmendra) गोंधळले होते. तसेच अमिताभ बच्चनबरोबरही (Amitabh Bachchan) घडले होते. यावर ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) म्हणाले होते, की तुम्ही लोक हिरो बनण्यास लायकही नाहीत? (Hrishikesh Mukherjee Scolded Amitabh Bachchan And Dharmendra)

धर्मेंद्र यांना मिळाला होता ड्रायव्हरचा ड्रेस

आसरानी यांनी २०१६ मध्ये पीटीआयला एक मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते, त्या दिवसांमध्ये पैशांची ओढताण होत होती. आम्ही जुन्या चित्रपटांची कपडे आणत होतो. मला साधारणपणे चित्रपटांमध्ये सूट परिधान करायला मिळत नव्हता. त्या दिवशी मी सूट परिधान केला होता. धर्मेंद्र घाबरले आणि म्हणाले, काय चालू आहे ? सीन काय आहे? तुम्हाला सूट मिळाले आहे आणि मला ड्रायव्हरचा ड्रेस? सूट तर आपल्या बापाचेही नाही देणार ऋषिकेश मुखर्जी.

धर्मेंद्र यांच्यानंतर अमिताभ यांचा नंबर

ऋषिकेश हे धर्मेंद्र यांच्यावर ओरडले, ए धरम, आसरानीला काय विचारतो? सीन ना? कथेची कोणतीही जाण नाही, तू हिरो व्हायला हवा? आसरानी म्हणाले होते, अमिताभ बच्चन यांनीही हाच प्रश्न विचारला होता. अहो, तुम्ही आज सूटमध्ये कसे ? अमिताभ यांनी मला विचारले, तू कोणाच्या कार्यालयात आहे, सीन काय आहे? दादाने हे पुन्हा पाहिले आणि ओरडले, ए अमित, तू आसरानीला का विचारतोय? कथा किंवा सीन ? धरम, जे तुला सांगितले आहे, ते त्याला सांग. तुम्हा लोकांना स्टोरीचा सेन्स नाही. मग हिरो कसे बनाल? जा काम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT