Hrithik Roshan says Rakesh Roshan was told
Hrithik Roshan says Rakesh Roshan was told  esakal
मनोरंजन

Hrithik Roshan Birthday: 'कहो ना प्यार है' साठी मी पहिली पसंती नव्हतोच, वडिलांनी तर..., हृतिकनं इतक्या वर्षांनी केला होता खुलासा!

युगंधर ताजणे

Hrithik Roshan says Rakesh Roshan was told : आज हृतिक रोशन आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्याचा सुपरहिट सिनेमा कहो ना प्यार है बाबात एक खास किस्सा जाणुन घेऊया.

ज्या चित्रपटानं हृतिकला यशाच्या शिखरावर नेलं त्या कहो ना प्यार हैची गोष्टच वेगळी होती. त्यावेळी या चित्रपटानं फिल्मफेयचे सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावावर केले होते. बॉलीवूडला एक मोठा सुपरस्टार मिळाला होता. हृतिकनं त्या चित्रपटाविषयी एक धक्कादायक खुलासा केला होता.

2000 साली हृतिक आणि अमिषाचा कहो प्यार है प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केले होते. यानंतर त्यांनी पुढे हृतिकला घेऊन आणखी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यात कोई मिल गया, क्रिश, क्रिश २ या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. हे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी झाले होते. आता हृतिकनं त्याचा पहिला चित्रपट कहो ना प्यार है विषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हृतिक म्हणतो, कहो ना प्यार है मध्ये माझ्या वडिलांची पहिली पसंती काही मी नव्हतोच. माझ्या ऐवजी ते दुसऱ्याच अभिनेत्याला घेणार होते. मी आता त्या अभिनेत्याचे नाव घेणार नाही. कारण तो मोठा अभिनेता आहे. मला कुणाचे नाव घेऊन पुन्हा वाद तयार करायचा नाही. पण लोकं जेव्हा नेपोटिझमसारखे वाद करत बोलतात तेव्हा त्यांना काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात.

एका मुलाखतीमध्ये हृतिकनं त्याच्या कहो ना प्यार है विषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. खरं तर या चित्रपटापासून हृतिकची गाडी सुसाट सुटली. तो बॉलीवूडचा मोठा स्टार झाला. त्याच्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला. आज हृतिकच्या नावाची जी क्रेझ आहे त्यात त्याच्या या चित्रपटाचा सर्वाधिक वाटा आहे. त्यात त्यानं जो डान्स केला तो आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

कहो ना प्यार है नंतर देखील पपांना मला कोणत्याही चित्रपटासाठी घ्यायचे नव्हते. त्यांनी मला स्वतच्या क्षमतेवर विश्वास ठेवून संघर्ष करण्यास सांगितले. पण कहो ना प्यार है चा प्रभाव एवढा होता की, पुढील स्क्रिप्टही मला साजेशा अशाच होता. आणि तो प्रवास सुरु राहिला. असेही हृतिकनं यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार विधानसभेच्या कामाला! पुण्यात दोन माजी आमदारांनी घेतली पवारांची भेट

Team India’s Jersey: काय सांगता? टीम इंडियाच्या जर्सीमध्ये मोठी चूक? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणीच दिले नाही लक्ष

Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगटची सुवर्ण बाजी, मारियाला हरवून जिंकली स्पेन ग्रांप्री कुस्ती स्पर्धा

Mahayuti Sarkar: महाराष्ट्राला गतिशील करण्याचा आमच्या सरकारचा संकल्प; आ. रणधीर सावरकरांचा दावा

Police Bharti : पोलिस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत धावताना तरुणाचा मृत्यू; पोलिस मुख्यालयातील घटना

SCROLL FOR NEXT