Vikram Vedha Box Office Collection News Vikram Vedha Box Office Collection News
मनोरंजन

Box Office Collection : विक्रम वेधाचे ओपनिंग कलेक्शन अक्षयच्या फ्लॉपपेक्षा कमी; मात्र...

विक्रम वेधाचे ओपनिंग कलेक्शन गंगूबाई काठियावाडीच्या बरोबरीचे

सकाळ डिजिटल टीम

Vikram Vedha Box Office Collection News विक्रम वेधाचा ट्रेलर पाहून सर्वजण आनंदी झाले होते. यामुळे चित्रपट चालणार असे भाकीत व्यक्त करण्यात येत होते. आता बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection ) विक्रम वेधाच्या ओपनिंग कलेक्शनचे आकडे आले आहेत. चित्रपटाची सुरुवात अपेक्षेपेक्षा चांगली नसल्याचे दिसत आहे. मात्र, चित्रपटगृहांमधून परतलेले लोक कौतुक करीत आहेत. अशा स्थितीत विक्रम वेधाला फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. विक्रम वेधासाठी शनिवारी झालेली आगाऊ बुकिंगही याच दिशेने बोट दाखवत आहे.

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर सुमारे १०.५० कोटींची कमाई केली आहे. अंतिम आकडे यापेक्षा किंचित चांगले असू शकतात. परंतु, याचा फारसा फरक पडणार नाही. सकारात्मक बाजू अशी आहे की, शुक्रवारी आगाऊ बुकिंगमधून एकूण २.९७ कोटींची कमाई झाली. यामुळेच चित्रपटाची कमाई १० कोटींच्या पुढे गेली आहे.

२०२२ मधील बॉलिवूड चित्रपटांच्या सर्वांत मोठ्या ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचे तर ब्रह्मास्त्र शीर्षस्थानी आहे. ब्रह्मास्त्रने भारतात पहिल्या दिवशी ३६ कोटी कमावले होते. मात्र, विक्रम वेधाचे ओपनिंग कलेक्शन या वर्षातील अनेक मोठ्या फ्लॉप चित्रपटांपेक्षा कमी आहे. अक्षय कुमारचा बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि आमिर खानचा लाल सिंह चड्ढापेक्षाही कमी आहे. मात्र, विक्रम वेधाचे ओपनिंग कलेक्शन आलियाचा हिट चित्रपट गंगूबाई काठियावाडीच्या बरोबरीचे आहे.

शनिवारी १३,८०० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली

शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी विक्रम वेधाची आगाऊ बुकिंगमध्ये (Advance booking) १३,८०० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली आहेत. शनिवारसाठी विक्रम वेधाचे आगाऊ बुकिंग ३.३६ कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. चित्रपटाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचाही फायदा होणार आहे. विक्रम वेधा भारतात ४,००० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे हा एक मोठा चित्रपट म्हणता येईल. ओपनिंगनुसार विक्रम वेधाला बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

२०२२ मधील चांगले ओपनिंग कलेक्शन

  1. ब्रह्मास्त्र - ३६ कोटी

  2. भूल भुलैया २ - १४.११ कोटी

  3. बच्चन पांडे - १३.२५ कोटी

  4. लाल सिंग चड्ढा - ११.७० कोटी

  5. सम्राट पृथ्वीराज - १०.७०

  6. विक्रम वेधा - १०.५० कोटी

  7. गंगुबाई काठियावाडी - १०.५०

  8. शमशेरा - १०.२५ कोटी

  9. जुग जुग जिओ - ९.२८ कोटी

  10. रक्षाबंधन - ८.२० कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT