Hrithik Roshan Mumbai Metro:  Esakal
मनोरंजन

Hrithik Roshan: मुंबई मेट्रोत दिसला हृतिक मात्र लोकांना विश्वास बसेना! नेमकं काय झालं? व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Hrithik Roshan Mumbai Metro: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा नेहमी चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटांमुळे कमी अन् वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाइटमध्ये राहतो. हृतिक त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'फायटर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृतिकचे चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान हृतिकचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हायरल व्हिडिओत हृतिक मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे.

हृतिक रोशन शुक्रवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना अचानक दिसल्याने लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. हृतिकने चित्रपटाच्या शूटिंगला जाण्यासाठी आपली कार सोडून थेट मुंबई मेट्रो पकडली.

हृतिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मेट्रो राईडचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो त्याच्या चाहत्यांसोबत पोझ देताना आणि ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहे.

या फोटोसोबत हृतिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, "उष्णता ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि स्टंट करण्यासाठी माझी पाठ वाचवण्यासाठी मी मेट्रो घेतली. काही अतिशय सुंदर लोक भेटले आणि त्यांच्याकडून मला मिळालेले सर्व प्रेम मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच अद्भुत होता."

मेट्रोमध्ये हृतिकला पाहून लोकांना आश्चर्य वाटले, त्याच्या चाहत्यांसाठी हे खुप मोठं सरप्राईज होतं. अनेकांनी हृतिकला सेल्फीची विनंती केली आणि हृतिकने लोकांना अजिबात निराश केले नाही.

हृतिक रोशन त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याची गर्लफ्रेंड सबा आझादमुळे हृतिक चर्चेत राहतो. मात्र सध्या हृतिक रोशन मेट्रोमध्ये प्रवास केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. अलीकडेच हृतिक दीपिका पदुकोणसोबत परदेशातील 'फायटर'चे शूटिंग पूर्ण करून परतला. सिद्धार्थ आनंदचा 'फाइटर' पुढील वर्षी २५ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT