Hrithik Roshan teaches son Hridhaan how to conquer his fear as he gets scared before bungee jump. Watch Google
मनोरंजन

Video Viral: 'भीतीवर कसं ठेवणार नियंत्रण?' हृतिक रोशन काय म्हणतोय पहा...

हृतिक रोशननने आपला मुलगा हृदान रोशनला बंजी जंपिंगचे ट्रेनिंग देताना भीतीवर कसं नियंत्रण ठेवायचं याचा अमूल्य सल्ला देणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan) आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवताना दिसतो. तो अनेकदा त्यांना घेऊन सहलीवरही जात असतो आता सध्या हृतिकचा मुलासोबतचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. हृतिकची मुलं त्याच्यासारखीच स्पोर्टी आहेत. त्यांना देखील आपल्या वडीलांसारखेच अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटी करणं आवडतं. नुकतेच हृतिक रोशनने बंजी जंपिंग करतानाचा आपल्या मुलांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दिसत आहे हृदान रोशन एकदम रेडी पोझिशनमध्ये म्हणजे बंजी जंपिंग करण्यासाठी उडी मारण्यासाठी टोकावर बसलेला दिसत आहे. हृतिक रोशन हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे आणि म्हणताना दिसत आहे,''जर तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरत असाल,तर लक्षात ठेवा तुम्ही त्याच गोष्टीवर अधिक प्रेम करायला लागता''. हा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत हृतिक त्याच्या मुलाला भीतीवर कसं नियंत्रण मिळवायचं हे शिकवताना दिसत आहे.(Hrithik Roshan teaches son Hridhaan how to conquer his fear as he gets scared before bungee jump. Watch)

हृतिक एवढं बोललल्यानंतर त्याचा मुलगा हृदाननं एक मोठा दिर्घ श्वास घेतला,कारण ट्रेनर त्याला काहीतरी सांगत आहे. हृतिकनं आपल्या मुलाचं मनोबल वाढवत म्हटलं, ''हळू,हळू, पुरेसा वेळ घे,तुला काहीच लागणार नाही.तुझ्या मेंदूवर नियंत्रण ठेव, त्याला सांग आता ५ सेकंदात आपण खाली झोकून देणार आहोत स्वतःला. मला वाटतं हे करायला तू शिकलं पाहिजेस,यानंतर ते तुला सहज शक्य होईल, अगदी कुठल्याही बाबतीत आपल्या मेंदूवर,मनावर कंट्रोल करणं तू शिकशील''.

Hrithik Roshan teaches son Hridhaan how to conquer his fear as he gets scared before bungee jump. Watch

जसं हृदान उडी मारण्यासाठी तयार झाला,त्यानं आपल्या वडीलांना विचारलं की,''तो यामध्ये जिंकेल ना?'' हृतिक पटकन म्हणाला, ''हो नक्कीच. तुला माहित आहे हे कसं करायचं. तुला तुझ्या मेंदूवर कसं नियंत्रण ठेवायचं हे माहित आहे. आता जास्त विचार नको करू''. हृदानने उडी मारताच हृतिकही मुलाला ओरडून चिअर करताना दिसत आहे.

हृतिकने या व्हिडीओत आपल्या चाहत्यांशी संवाद साधतना म्हटलं आहे की,''कितीतरी वेळा जेव्हा मला भिती वाटते. तेव्हा मी हृदानचा विचार करतो. जेव्हा तुम्हाला मनात भिती वाटेल कोणत्या गोष्टीची तेव्हा या व्हिडीओत हृदानने स्वतःच्या भीतीवर कसं नियंत्रण मिळवलं अन् भीतीला हरवलं ते पहा. हे खूपच भन्नाट आहे. आजचा दिवसही ग्रेट ज्यादिवशी हृदानने आपल्या भीतीवर कंट्रोल मिळवला आहे''. हृतिकनं चाहत्यांना या व्हिडीओच्या माध्यामातून फ्लाइंग किसही दिलं आहे.

पुढच्या व्हिडीओच्या क्लीपमध्ये हृतिक आपल्या मुलांसोबत फोटो काढताना दिसत आहे. हृतिकने हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शन दिले आहे की, ''भीतीवर नियंत्रण मिळवलं,आजचा दिवस ग्रेट,थ्रोबॅक!'' हृतिकच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले आहे की,'तुम्ही एक चांगले पिता आहात. आपल्या मुलाला त्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप छान पद्धत समजावून सांगितली, तो देखील खूप धाडसी आहे'. तर दुसऱ्या एका चाहत्यानं हृतिकच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, 'तुम्हाला माहित आहे का सर,तुमची मुलं खूप भाग्यवान आहेत. कारण तुम्ही त्यांचे वडील आहात,ही खूप अभिमानाची गोष्ट आहे'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: फेडच्या व्याजदर कपातीचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Mohammad Nabi: अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी घेणार निवृत्ती, 'ही' टूर्नामेंट असेल शेवटची

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोलाची कामगिरी; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

SCROLL FOR NEXT