Hrithik ROshan Zomato Ad Controversy Mahakal Temple Priest want Zomato to withdraw it Google
मनोरंजन

हृतिकने दुखावल्या हिंदूंच्या धार्मिक भावना; झोमॅटोच्या जाहिरातीनं पडला वादात

हृतिक रोशननं केलेल्या झोमॅटोच्या एका जाहिरातीत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदीराचा उल्लेख तिथल्या पुजाऱ्यांना खटकला आहे.

प्रणाली मोरे

Hrithik Roshan Ad Controversy:बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या एका नव्या जाहिरातीनं चांगलाच वादात सापडला आहे. ही जाहिरात झोमॅटो कंपनीची आहे,जी ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या व्यवसायातलं मोठं नाव आहे. हृतिक त्या जाहिरातीत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदीराचा उल्लेख करताना दिसत आहे. ज्यावरनं आता वाद छेडला गेला आहे. हृतिकवर या नव्या जाहीरातीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लागला आहे.(Hrithik ROshan Zomato Ad Controversy Mahakal Temple Priest want Zomato to withdraw it)

झोमॅटोच्या एका नव्या जाहिरातीत हृतिक बोलताना दिसत आहे की,''मला भूक लागली होती, मी महाकालमधूल थाळी ऑर्डर केली''. उज्जैन महाकालेश्वर मंदीराच्या नावाचा उल्लेख करत हृतिक रोशनची ही जाहिरात सोशल मीडियावर सुरु आहे,ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे.

झोमॅटोच्या जाहिरातीत हृतिक कितीतरी छोट्या-मोठ्या शहरांची नाव घेताना दिसत आहे. यातीलच एकात तो उज्जैनचा देखील उल्लेख करतो. ज्यामध्ये हृतिक फूड डिलीव्हरी बॉयकडून खाण्याचं पॅकेट स्विकारल्यानंतर बोलतो,''थाली खायचं मन केलं, उज्जैनमध्ये आहे, तर महाकालकडून मागून घेतलं''. हृतिकच्या याच जाहिरातीवरनं आता गोंधळ सुरू झाला आहे. मंदीरातील पुजाऱ्यांनी याचा विरोध करायला सुरुवात केली आहे. श्रद्धाळू लोक यामुळे हैराण तर झालेच आहेत पण नाराज देखील झाले आहेत.

पुजाऱ्यांनी हृतिक रोशनला आणि झोमॅटो कंपनीला माफी मागण्याची मागणी केली आहे. या वादावर कलेक्टर आशिष सिंग म्हणाले आहेत की- ''हे प्रकरण माझ्या विभागात घडलं आहे,त्यामुळे याचा तपास सुरू आहे. हा व्हिडीओ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतो आणि त्यामुळे सुरू असलेला वाद हिंसक वळणही घेऊ शकतो''.

उज्जैनच्या महाकाल मंदीराच्या पुजाऱ्याने म्हटले आहे की, ''जी कंपनी देशातील नागरिकांना शाकाहरीसोबत मांसाहरी अन्न घरपोच पोहोचवण्याची सेवा देते,त्यांना महाकालच्या नावाचा उल्लेख आपल्या जाहिरातीत करणं थांबवलं पाहिजे. अन्यथा पुजारी संघ पोलिसांकडे याची रीतसर तक्रार करेल. पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की, कंपनीनं हिंदू भावना दुखावल्या आहेत. आणि याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कंपनीनं माफी मागितली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ''.

या वादग्रस्त जाहिरातीमुळे आता हृतिक रोशनच्या अडचणीत मात्र वाढ होऊ शकते. आणि याचा परिणाम त्याच्या 'विक्रम वेधा' सिनेमावरही होऊ शकतो. याआधीच हृतिकनं 'लाल सिंग चड्ढा'ला पाठिंबा दिला तेव्हा लोकांनी त्याच्या 'विक्रम वेधा'वर बहिष्कार घालू असं म्हटलं होतं. आता या वादग्रस्त जाहिरातीमुळे पुन्हा हृतिकविरोधात बॉयकॉट ट्रेंड सुरू होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT