Saba Azad thanked Hrithik Roshan's family members for sending her food.  Google
मनोरंजन

'माझं कुटुंब,माझी माणसं';हृतिक रोशनच्या कुटुंबासाठी सबाची पोस्ट

हृतिक आणि सबा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

प्रणाली मोरे

हृतिक रोशन(Hrithik roshan) आणि सबा आझादला(Saba Azad) गेल्या काही दिवसांत अनेकदा लंच किंवा डिनर डेटसाठी एकत्र पाहिलं गेलं अन् त्यानंतर चर्चा रंगली ती त्यांच्या अफेअर्सची. दोघे एकमेकांना डेट करत आहेत यावर अनेकदा सगळ्यांचे एकमत झालं ते गेल्या काही दिवसांतील यांच्या फोटो आणि पोस्टमुळे. आता नुकतीच सबानं एक पोस्ट केलीय त्यानंतर तर बातमी पक्कीच आहे दोघांची असं म्हणायला हरकत नाही.

Saba Azad shared a picture on Instagram Stories.

सबानं जेवणाचा एक फोटो पोस्ट करत लिहिलंय,''जेव्हा तुम्हाला तुमच्या घरची आठवण येत असते तेव्हा तुमच्या हक्काच्या माणसांनी पाठवलेलं प्रेम खूप काम करून जातं''. हृतिकच्या घरी बनवलेलं खास जेवण सबासाठी पाठविण्यात येतंय आजकाल. म्हणजे नक्कीच 'रिश्ता बनने जा रहा है'. सबानं ही पोस्ट करीत हृतिक रोशनच्या कुटुंबाचे आभार मानले आहेत. तिनं हार्ट इमोजीही सोबत पोस्ट केला आहे.

सबासाठी गेल्याच महिन्यात हृतिकच्या घरी लंच पार्टीचं आयोजनं करण्यात आलं होतं. तेव्हा हृतिकनं त्या पार्टीचा फोटो पोस्ट करत लिहिलं होतं,''तुमची माणसं सोबत असली की आनंद तुमच्या अवतीभवती कायम राहतो''. त्यावेळी हृतिकच्या आईवडिलांपासून,काकांपर्यंत सगळी भावंड देखील उपस्थित होती. तेव्हा चर्चा रंगली होती की रोशन फॅमिलिनं सबाचं आपल्या कुटुंबात स्वागत करण्यासाठी ही पार्टी ठेवली असणार. सबा हीअभिनय आणि संगीत अशा दोन्ही क्षेत्रांशी जोडलेली आहे. तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर आजकाल हृतिक न चुकता कमेंट करतच असतो. तर सबाही हृतिकवरचं प्रेम अनेकदा पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसते. आता त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे ते कधी एकदा हृतिक-सबा लग्नबंधनात अडकतायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT