IFFI 2022 these marathi movies are selected for international film festival of india  sakal
मनोरंजन

IFFI 2022: अभिमानास्पद! 'इफ्फी' चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट..

मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डंका, ही आहे यादी..

नीलेश अडसूळ

international film festival of india: भारतमध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा इंटरनॅशन फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया येत्या २० ते २८ नोव्हेंबर रोजी गोवा येथे होणार आहे. या चित्रपट महोत्सवाची ख्याती प्रचंड मोठी आहे. जगभरातील दर्जेदार चित्रपट या महोत्सवात येत असतात. अनेक चित्रपटांमधून काही मोजके चित्रपट निवडले जातात. मराठी प्रेक्षकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे. यंदा या मानाच्या महोत्सवात चार मराठी चित्रपटांनी मोहर उमटवली आहे.

(IFFI 2022 these marathi movies are selected for international film festival of india )

भारताच्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमात देशभरातील विविध भाषांतील मिळून ३५४ चित्रपट दाखल झाले होते. त्यात चार मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत दर्जेदार आशयाचे ही चित्रपट आता आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवणार आहेत.

यामध्ये विक्रम पटवर्धन दिग्दर्शित ' फ्रेम', डाॅ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं?' आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज ' हे पॅनोरमाच्या मुख्य विभागासाठी निवडले गेले आहेत तर उत्तम व्यावसायिक यश या विभागात प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

पॅनोरमा विभागात हिंदी, बंगाली, मल्याळम इत्यादी भाषांतील चित्रपटांप्रमाणेच इरुला, मैथिली या भाषांतील मिळून पंचवीस चित्रपट निवडण्यात आले आहेत. नाॅन फिचर फिल्म विभागात वीस लघुपट निवडण्यात आले असून भूतिया, कोंकणी, संस्कृत या भाषांतील लघुपट निवडण्यात आले आहेत. भारतात लहान मोठ्या अशा अनेक भाषांतील चित्रपटांना इफ्फीत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याचे अधोरेखित होत आहे. २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पणजी येथे इफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT