IFFM 2023 IFFM 2023 full winners list: Esakal
मनोरंजन

IFFM 2023 full winners list: कोण ठरलं सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री आणि सिनेमा.. IFFM 2023 विषयी सविस्तर एका क्लिकवर

Vaishali Patil

IFFM 2023 full winners list: भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न म्हणजेच IFFM सोहळ्याचे काल शुक्रवारी ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला केवळ बॉलीवूडनेच नव्हे तर साउथच्याही अनेक कलाकारांनी हजेरी लावली. तसेच अनेक कलाकारांनी या पुरस्कारा मिळवला आहे.

अभिनेता ,अभिनेत्री, चित्रपट, ओटीटी रिलिज यांसाठीही हे पुरस्कार देण्यात आले. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कार राणी मुखर्जी हिने मिळवला तर ग्लोबल स्टार म्हणुन कार्तिक आर्यनची निवड करण्यात आली. तसेच सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा आणि OTT यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरवण्यात आले.

सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार 'टू किल अ टायगर'

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट - आग्रा

सर्वोत्कृष्ट अभिनय करणारा अभिनेता - मोहित अग्रवाल, आग्रा

सर्वोत्कृष्ट अभिनय करणारी अभिनेत्री- राणी मुखर्जी, मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - पृथ्वीराज कोनानूर, हेडिलेंटू

सर्वोत्कृष्ट चित्रपट - सीता रामम

वेबसिरिज सर्वोत्तम कामगिरी करणारा अभिनेता म्हणुन दहाडसाठी विजय वर्मा ने तर अभिनेत्री म्हणुन राजश्री देशपांडे यांना ट्रायल बाय फायर या सिरिजसाठी पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट वेबसिरिजचा पुरस्कार 'ज्युबिली' ने मिळवला.

सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणुन 'पीपल्स चॉइस - कनेक्शन क्या है' आणि 'ऑस्ट्रेलिया - होम' यांना पुरस्कार देण्यात आला.

इक्वॉलिटी इन सिनेमा अवॉर्ड हा 'डार्लिंग्ज' सिनेमाला मिळाला तर पीपल्स चॉइस पुरस्कार शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाला मिळाला आहे. तर रायझिंग ग्लोबल सुपरस्टार म्हणुन कार्तिक आर्यनला सन्मानित करण्यात आलं. तर मृणाल ठाकूर ला देखील तिच्या सिनेमातील विविधतेमुळे पुरस्कार देण्यात आले. भूमी पेडणेकर हिला देखील यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आलं.

त्याचबरोबर दिग्दर्शक करण जोहरने भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याचा २५ वर्षांचा पूर्ण केल्याने त्याला पुरस्कार देण्यात आला तर भारतातील रायझिंग ग्लोबल सुपरस्टार कार्तिक आर्यनला विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT