IIFA 2023 winners list: अबू धाबीमध्ये 23 व्या IIFA पुरस्कारांची सुरुवात झाली आहे. सर्व बॉलीवूड स्टार्सनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली आहे. या वर्षी सर्व स्टार्स अवॉर्ड्समध्ये आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क करणार हे काही वेगळ सांगायची गरज नाही. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स 2023 च्या सिनेमॅटोग्राफी, पटकथा, संवाद आणि संपादन या तांत्रिक विभागातील पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. तर मुख्य कार्यक्रम शनिवारी होणार आहे.
यावेळी IIFA अवॉर्ड्समध्ये सर्वात जास्त गंगूबाई काठियावाडी आणि भूल भुलैया 2 या चित्रपटांनी कार्यक्रमात अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकला आहे.
आलिया भट्टच्या अन् संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने तीन श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहे. संजय आणि उत्कर्षिणी वशिष्ठ यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि संवादासाठी देखील पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरसोबतचा आलियाच्या 'ब्रह्मास्त्र: भाग एक - शिवा' या सर्वोत्कृष्ट स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स साठी पुरस्कार देण्यात आला आहे.
कोरिओग्राफर जोडी बॉस्को मार्टिस आणि सीझर गोन्साल्विस यांनी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' च्या टायटल ट्रॅकवरील कामासाठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा पुरस्कार पटकावला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित चित्रपटाने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाइनमध्ये देखील या चित्रपटाने दुसरा पुरस्कार मिळवला.
अजय देवगणच्या क्राईम थ्रिलर 'दृश्यम 2' ने सर्वोत्कृष्ट संपादनासाठी ट्रॉफी मिळवली. तर हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या 'विक्रम वेधा' ला सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर आणि वासन बालाच्या 'मोनिका ओ माय डार्लिंग' यांना सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंगसाठी पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट छायांकन - सुदीप चॅटर्जी (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट पटकथा - संजय लीला भन्साळी, उत्कर्षिणी वशिष्ठ (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट संवाद - उत्कर्षिनी वशिष्ठ, प्रकाश कपाडिया (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - बॉस्को सीझर (भूल भुलैया 2 शीर्षक ट्रॅक)
ध्वनी रचना - मंदार कुलकर्णी (भूल भुलैया २)
सर्वोत्कृष्ट संपादन - संदीप फ्रान्सिस (दृश्य २)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स (व्हिज्युअल) - डीएनईजी, रीडिफाईन (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर - सॅम सीएस (विक्रम वेधा)
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग - गुंजन ए साह, बोलॉय कुमार डोलोई, राहुल कर्पे (मोनिका ओ माय डार्लिंग)
आयफा मधील पहिल्या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर हा कार्यक्रम राजकुमार राव आणि फराह खान यांनी होस्ट केला होता. यात गायक अमित त्रिवेदी, बादशाह, सुनिधी चौहान, सुखबीर सिंग, पलक मुछाल आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग आणि युलिया वंतूर यांनी स्टेजवर डान्सने कहर केला. शनिवारी मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि अभिषेक बच्चन करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.