IIFA 2023 winners full list: इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स 2023 पुरस्कार ज्याला आयफा म्हटलं जातं. अबू धाबी येथे सुरु झालेला या कार्यक्रमाची काल सांगता झाली. यावेळच्या आयफा पुरस्कारात ब्रह्मास्त्र, गंगुबाई काठियावाडी आणि दृश्यम 2 यांसारख्या चित्रपटांनी बाजी मारली.
अबू धाबीमध्ये 23 व्या IIFA पुरस्कारांत सर्व बॉलीवूड स्टार्सनी या वर्षी अवॉर्ड्स शोमध्ये आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना थक्क केले. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
हृतिक रोशनला 'विक्रम वेधा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर आलिया भट्टला तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
गंगूबाई काठियावाडीसाठी IIFA 2023 मध्ये आलिया भट्टला प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळला मात्र तिचे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे निर्माता जयंतीलाल गडा यांनी आलियाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
'जुग जुग जीयो' मधील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनाही IIFA 2023 मध्ये पुरस्कार मिळाला. बेस्ट परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.
ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांना IIFA 2023 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गायक आणि संगीतकार ए आर रहमान यांनी कमल हसन यांनी हा पुरस्कार दिला. यावेळी कमल हसन यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.
अभिनेता आर माधवनला 'रॉकेट्री: द नंबी' इफेक्टसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तर अजय देवगणच्या 'दृष्यम 2' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या मराठी चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं.
IIFA 2023 च्या विजेत्यांची यादी...
सर्वोत्कृष्ट चित्रपट : दृश्यम २
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर माधवन रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: विक्रम वेधासाठी हृतिक रोशन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: ब्रह्मास्त्रसाठी मौनी रॉय
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर, जुग्ग जुग जीयो
सिनेमातील फॅशनसाठी उत्कृष्ट कामगिरी: मनीष मल्होत्रा
भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी: कमल हासन
सर्वोत्कृष्ट रूपांतरित स्टोरी: आमिल कीन खान आणि अभिषेक पाठक 'दृश्यम 2' साठी
सर्वोत्कृष्ट मूळ कथा: परवीज शेख आणि जसमीत रीन 'डार्लिंग्ज'
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष): गंगूबाई काठियावाडीसाठी शंतनू माहेश्वरी आणि बाबिल खान
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला): खुशाली कुमार झोका अराउंड द कॉर्नर
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला): ब्रह्मास्त्रमधील 'रसिया' गाण्यासाठी श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): ब्रह्मास्त्रमधील केसरिया गाण्यासाठी अरिजित सिंग
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: ब्रह्मास्त्रसाठी प्रीतम
सर्वोत्कृष्ट गीतकार: अमिताभ भट्टाचार्य ब्रह्मास्त्रमधील केसरिया गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट छायांकन : गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट पटकथा : गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट संवाद : गंगुबाई काठियावाडी
शीर्षक गीतासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: भूल भुलैया २
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन: भूल भुलैया २
सर्वोत्कृष्ट संपादन : दृश्यम २
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स (व्हिज्युअल): ब्रह्मास्त्र: भाग एक - शिव
सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोअर: विक्रम वेधा
सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग: मोनिका ओ माय डार्लिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.